घरक्रीडादीपा मलिक 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित

दीपा मलिक ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Subscribe

रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिला 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती भारतात राष्ट्रीय खेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी या दिवशी खेळातील सर्वोत्तम कामगिरीसाठी खेळाडूंना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. त्यानुसार आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिला ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पैलवान बजरंग पुनियालासुद्धा खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण भारताबाहेर असल्याने बजरंग या पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित होता.

- Advertisement -

राष्ट्रपती भवन येथे शानदार सोहळा संपन्न

राष्ट्रपती भवन येथे शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षक विमल कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी टेबल टेनिस कोच संदीप गुप्ता, राबीर सिंह खोकर (कबड्डी), मेजबान पटेल (हॉकी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांनाही द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्रॉन्झ पदक पटकावणारे बी. साई प्रणित यांच्यासह स्वप्ना बर्मन (हेप्टॅथलॉन), एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग), सोनिया (बॉक्सिंग), पूनम यादव (क्रिकेट), रेसलर पूजा ढांडा, प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), हरमीत देसाई (टेबल टेनिस) आणि फवाद मिर्जा तसेच क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मॅन्यूअल फेड्रिक्स (हॉकी), अरूप बसक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितेन किर्रताने (टेनिस) आणि लालरेमसानगा (तिरंदाजी) यांना मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

यांना मिळाला अर्जुन पुरस्कार

तेजिंदरपाल सिंह तूर (अॅथलेटिक्स), मोहम्मद अनस याहिया (अॅथलेटिक्स), एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग), सोनिया लाथर (बॉक्सिंग), रविंद्र जडेजा (क्रिकेट), चिंगलेनसाना सिंह कंगुजम (हॉकी), अजय ठाकुर (कबड्डी), गौरव सिंह गिल (मोटर स्पोर्ट्स), अंजुम मोद्गिल (शूटिंग), हरमीत राजुल देसाई (टेबल टेनिस), सुंदर सिंह गुर्जर (पैरा स्पोर्ट्स), सिमरन सिंह शेरगिल (पोलो)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -