नवीन उल हकने संपूर्ण स्टेडियमला दिला असा इशारा; कोहलीच्या चाहत्यांना म्हणाला…

 

कोलकाताः आयपीएल-२०२३ चा कोलकाता नाईट रायडर्स् आणि लखनऊ सुपर जायटंसचा शनिवारचा सामना रोमांचक झाला. कोलकाता रायडर्सच्या तोंडचा विजय लखनऊ जायटंसने खेचून आणला. या सामान्यात नवीन उल हकने प्रेक्षकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. तोंडावर बोट ठेवून, कोहली… कोहली… ओरडणाऱ्या प्रेक्षकांना गप्प बसण्याचा इशारा केला.

लखनऊ जायटंसने कोलकत्ता रायडर्सला अवघ्या १ धावाने हरवले. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना झाला. कोलकाताचा सामना असल्याने स्टेडियम क्रिकेट प्रेमींना खच्च भरले होते. कोहली आणि उल हकमध्ये वाद झाल्याने प्रत्येक खेळीवर अख्या स्टेडियममध्ये कोहली… कोहली… असाच आवाज होता. कोहलीच्या आवाजाने स्टेडियम दणाणून निघत होते. हे सर्व उल हकला डिवचण्यासाठी सुरु होते. कोलकाता रायडर्सच्या रिंकू सिंहने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये धुंवाधार फलंदाजी केली. तरीही कोलकत्ता रायडर्सला विजय मिळवता आला नाही.

मात्र नवीन उल हक गोलंदाजी करत असताना प्रेक्षकांमधून कोहली… कोहली… अशी ओरड सुरु होती. उल हक फिल्डिंगसाठी उभा असतानाही कोहली… कोहली… ओरडून प्रेक्षक त्याला डिवचत होते. त्याचवेळी कोलकाता रायडर्सच्या फलंदाज बाद झाला. तेव्हा उल हकने कोहलीच्या चाहत्यांना शांत राहण्याचा इशारा केला. तोंडावर बोट ठेवून उल हकने त्यांना शांत राहण्यास सांगितले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२३च्या (IPL 2023) १६ हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर (Kohli vs Gambhir) यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. आरसीबी आणि लखनऊमधील (RCB Vs LSG) सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात वाद झाला होता. यावेळी लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक देखील मुख्य भूमिकेत होता. गौतम गंभीरने सोशल मीडियावरून विराट कोहलीवर टीका केली होती.

कोहलीने विनाकरण नवीन उल हकशी पंगा घेतला होता. सिराज आणि नवीन यांचे बोलणे संपले होते. पण त्यानंतर कोहली नवीनला भिडला होता. आपल्याला कोहलीने शिवी दिल्याचेही नवीनने म्हटले होते. ही सर्व गोष्ट घडल्यावर नवीन उल हक काही शांत बसलेला नाही. नवीन उल हकने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. “लोकांशी तुम्हाला जसे वागायचे आहे तसे वागा. तुम्हाला ज्या पद्धतीने बोलायचे आहे, त्या पद्धतीने लोकांशी बोला.” असं नवीन म्हणाला होता. परंतु या पोस्टवर गंभीरने कमेंट करत कोहलीवर वार केला. यावेळी गंभीर म्हणाला की, ” जसा आहेस तसाच राहा, कधीच बदलू नकोस.” ही कमेंट करत असताना गंभीरने कोहलीला लक्ष्य केले होते.