घरक्रीडाNeeraj Chopra : ...जेव्हा मुलीला विचारले तुझे फेवरेट कोण आहे; उत्तर ऐकून...

Neeraj Chopra : …जेव्हा मुलीला विचारले तुझे फेवरेट कोण आहे; उत्तर ऐकून नीरज चोप्रा पण झाला थक्क

Subscribe

ऑलिम्पिकमध्ये सुपर्ण पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा सतत चर्चेत राहिला आहे

ऑलिम्पिकमध्ये सुपर्ण पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा सतत चर्चेत राहिला आहे. नीरज चोप्रा कधी गावातील लोकांना भेटण्यासाठी जातो तर कधी मित्रांशी मनमोकळेपणाने वावरत असतो. दरम्यान आता नीरज चोप्राचा अहमदाबादमधील व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी देखील नीरज सोशल मीडियावर चर्चेत राहिला होता. त्यामध्ये नीरज चोप्रा पानिपत शिवाजी स्टेडियममध्ये पोहचला होता. तिथे त्याने एका मुलीशी संवाद साधला आणि त्या मुलीने दिलेले उत्तर ऐकून तो थक्क झाल्याचे पहायला मिळाले.

ऑलिम्पियन सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पानिपतच्या शिवाजी स्टेडियमवर पोहोचला असता त्याने तेथील एका लहान मुलीशी चर्चा केली. तेव्हा मुलांनी विचारले की तुमचे आवडते कोण आहेत, मात्र एका मुलीने दिलेले उत्तर ऐकून नीरजला आश्चर्य वाटले. नीरज स्टेडियमवर पोहचल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काठण्यासाठी गर्दी उसळली. स्टेडियममध्ये त्याचे स्वागत करण्यात आले. या दरम्यान नीरज तेथील एका लहान मुलीच्या जवळ गेला आणि त्याने मुलीला तुझा फेवरेट कोण विचारले तर त्या मुलीने तुम्हीच माझे फेवरेट आहात असे सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

नीरज चोप्रा गेल्या महिन्यात रात्री मित्रांना भेटण्यासाठी गावी पोहोचला होता. गावात पोहोचल्याची माहिती मिळताच कुटुंबीयही चकित झाले होते. लक्षणीय बाब म्हणजे ११ वर्षांपूर्वी नीरज चोप्राने याच मैदानातून सराव करण्यास सुरूवात केली होती. इथे तो त्याच्या मित्रांसोबत सराव करत असे.


हे ही वाचा: http://ICC Test Rankings : भारत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर; न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -