घरक्रीडा'हिंदकेसरी' अभिजीत कटकेच्या प्रशिक्षणासाठी भानगिरेंनी दिला 2 लाखाचा धनादेश

‘हिंदकेसरी’ अभिजीत कटकेच्या प्रशिक्षणासाठी भानगिरेंनी दिला 2 लाखाचा धनादेश

Subscribe

यंदाचा ‘हिंद केसरी’ किताब महाराष्ट्राला मिळाला आहे. पुण्यातील पैलवान अभिजीत कटके यांनी यंदा मैदान मारले असून, हरियाणाचा पैलवान सोमवीर याला पराभूत केले. या विजयानंतर अभिजीत कटके याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले.

यंदाचा ‘हिंद केसरी’ किताब महाराष्ट्राला मिळाला आहे. पुण्यातील पैलवान अभिजीत कटके यांनी यंदा मैदान मारले असून, हरियाणाचा पैलवान सोमवीर याला पराभूत केले. या विजयानंतर अभिजीत कटके याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले. अशातच अभिजीत कटके याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी शिवसेना (बाळासाहेबांची) शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी 2 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे. (Two Lakh Rupees For Training To Hindkesari Abhijit Katake By Pramod Bhangire)

मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेश, मानाची गदा, शाल श्रीफळ देऊन कटके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पुणेशहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्यासह जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, सचिन तरवडे, करण भानगिरे, आकाश भानगिरे, अमित दाभाडे उपस्थित होते.

- Advertisement -

“अभिजित कटके यांनी मिळवलेल्या यशाने राज्याच्या नावलौकीकात भर पडली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे, यासाठी राज्यसरकारसह समाजातील दानशुरांनी त्याच्या पुढील सरावासाठी आर्थिक मदत करावी”, असे पुणेशहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी म्हटले.

हिंद केसरी स्पर्धा भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजली जाते. त्यामुळे यंदाची ‘हिद केसरी’ गदा पुण्याचा पैलवान अभिजीत कटके याने पटकावल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. या ‘हिंद केसरी’ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला 4-0 अशा फरकाने पराभूत केले.

- Advertisement -

याआधी, 2017 सालची महाराष्ट्र केसरीची गदा अभिजीत कटकेने पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. अभिजीत कटकेच्या या विजयानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.


हेही वाचा – IND vs SL : दुसऱ्या वनडेत भारताची श्रीलंकेवर मात, मालिकेत २-० अशी आघाडी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -