घरक्रीडाNZ vs PAK: आगामी २ वर्षांत न्यूझीलंड करणार २ वेळा पाकिस्तान दौरा,...

NZ vs PAK: आगामी २ वर्षांत न्यूझीलंड करणार २ वेळा पाकिस्तान दौरा, पाच महिन्यांमध्ये दोन्ही संघात होणार १५ सामन्यांचा थरार

Subscribe

न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आगामी वर्षातील डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर २०२३ मध्ये किवी संघ पाच एकदिवसीय मालिका आणि टी-२० सामन्यांसाठी पाकचा दौरा करणार आहेत. या संघाने २०२१ टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानमध्ये त्यांच्या खेळाडूंना सुरक्षा नाहीये. हे माहिती झाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सामना सुरू होण्यापूर्वीच रद्द केला होता. परंतु आता पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं न्यूझीलंडने सांगितलं आहे.

डिसेंबर २०२२ पासून एप्रिल २०२३ पर्यंत न्यूझीलंडचा संघ दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचं पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. पहिल्या डिसेंबर महिन्यात किवी टीम दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये न्यूझीलंड पाकिस्तानचा दुसरा दौरा करणार असून एकदिवसीय मालिका आणि पाच टी-२० सामने खेळले जाणार आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंड संघाने पाकिस्तानमधून माघार घेतली होती. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान देखील झालं होतं.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची माघार

श्रीलंका संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात आलेलं नाहीये. सुरक्षा नसल्यामुळे कोणत्याही संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाहीये. श्रीलंका, झिम्मबाब्वे आणि वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांसारख्या संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाहीये. मात्र, आता मार्च २०२२ पासून एप्रिल २०२३ च्या दरम्यान पाकिस्तान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड विरूद्ध एकूण आठ कसोटी मालिका, ११ एकदिवसीय मालिका आणि १३ टी-२० सामने खेळले जाणार आहेत.


हेही वाचा : ST Workers Strike: परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक वारंवार त्रास दिला जातोय – गुणरत्न सदावर्ते

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -