घरक्रीडान्यूझीलंडच्या भेदक मार्‍यापुढे श्रीलंकेची शरणागती

न्यूझीलंडच्या भेदक मार्‍यापुढे श्रीलंकेची शरणागती

Subscribe

विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने २०१९ विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून न्यूझीलंडने मात केली आहे. भेदक मार्‍याच्या जोरावर श्रीलंकेला १३६ धावांवर गारद केल्यानंतर न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १३७ धावांचे आव्हान एकही गडी न गमावता सहज पूर्ण केले. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरोने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मार्टीन गप्टीलने नाबाद ७३ तर मुनरोने नाबाद ५८ धावा केल्या. श्रीलंकेचा एकही गोलंदाज न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडू शकला नाही.

लॉकी फर्ग्युसन-मॅट हेन्री आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर न्यूझीलंडने आपल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला १३६ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. श्रीलंकेकडून कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि कुशल आणि थिसारा पेरेरा यांनी थोडीफार झुंज दिली. पहिल्याच षटकात लहिरु थिरीमनेला माघारी धाडत मॅट हेन्रीने श्रीलंकेला पहिला धक्का दिला.

- Advertisement -

मधल्या फळीतील एकही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. श्रीलंकेच्या शेपटाला झटपट गुंडाळत न्यूझीलंडने १३६ धावांत लंकेच्या संघाला बाद केलं. कर्णधार करुणरत्ने ५२ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांना ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी-ग्रँडहोम, जेम्स निशम, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -