घरIPL 2020IPL 2020 : बेन स्टोक्स यंदा खेळण्याची शक्यता कमी - मॉन्टी पानेसर

IPL 2020 : बेन स्टोक्स यंदा खेळण्याची शक्यता कमी – मॉन्टी पानेसर

Subscribe

स्टोक्स वैयक्तिक कारणांमुळे अजून युएईमध्ये दाखल झालेला नाही.

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणार होता. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे तो अजून युएईमध्ये दाखल झालेला नाही. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने तो सध्या त्यांच्यासोबत न्यूझीलंडमध्ये आहे. स्टोक्स सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू मानला जात असल्याने तो राजस्थानसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, तो यंदाच्या स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमीच असल्याचे इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरला वाटते.

त्याची उणीव राजस्थानला भासेल

बेन स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळेच तो न्यूझीलंडमध्ये असून यंदाच्या आयपीएलमधील त्याच्या सहभागाबाबत मला साशंकता वाटते. स्टोक्स हा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान देतो. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये खेळावे असे प्रत्येकालाच वाटत आहे. मात्र, त्याच्या वडिलांची प्रकृती लक्षात घेता तो यंदाच्या स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याची उणीव राजस्थानला नक्कीच भासेल. परंतु, त्याच्याविनाही हा संघ चांगला खेळ करू शकतो, असे पानेसरने एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -

वेगवान गोलंदाज छाप पाडतील 

यंदा आयपीएल स्पर्धा युएईत होत असून येथील खेळपट्ट्या फिरकीपटूंना साजेशा आहेत. मात्र, वेगवान गोलंदाजही आपली छाप पाडतील असे पानेसरला वाटते. आयपीएल स्पर्धेत खेळपट्ट्यांकडून फिरकीपटूंना मदत मिळतेच. मात्र, यंदाच्या मोसमात वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करतील असे मला वाटते. युएईतील खेळपट्ट्यांवर थोडे गवत आहे, तसेच चेंडू थोडा स्विंग होऊन वेगाने जात आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल मोसमात वेगवान गोलंदाज आपली छाप पाडू शकतील. नेहमीप्रमाणेच यंदा फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असणारच आहे, असे पानेसर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -