घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: मुंबई पोलिसांनंतर आता CBI आणि NCB तपास यंत्रेणवर प्रश्न...

Sushant Suicide Case: मुंबई पोलिसांनंतर आता CBI आणि NCB तपास यंत्रेणवर प्रश्न चिन्ह

Subscribe

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले असून सुशांतने आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही आहे. दरम्यान सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांवर आरोप केल्यानंतर आता सीबीआयवरच सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतप्रकरणाची कुठलीही माहिती अद्याप सीबीआयने दिली का नाही? सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हेसुद्धा अजूनही स्पष्ट केलेले नाही?, असे प्रश्न सुशांतचा वकिलांनी उपस्थित केले आहे.

तसेच सध्या सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळ्याचे दिशेला जात असल्याची भावना सुशांतच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. सध्या घडीला ड्रग्ज प्रकरणावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतल्यापासून एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही आहे. तसेच त्याचा तपासाचा वेगही समाधानकारक नाही, असे शब्दांत वकील विकास सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुंबई पोलिसांप्रमाणे एनसीबीदेखील फक्त सेलिब्रिटींची फॅशन परेड करत आहेत, असे सिंह म्हणाले

- Advertisement -

‘एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतच्या मृतदेहाचे फोटो पाहून २०० टक्के हत्या असल्याचे सांगितले होते. ही आत्महत्या असू शकत नाही. असे डॉक्टरांचे म्हणणे होते. तरी पण सीबीआय हत्येच्या दिशेने तपास का करत नाहीत, असा सवाल विकास सिंह यांनी शुक्रवारी केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – करण जोहरच्या पार्टीवर NCBची नजर, पार्टीत कोकीनचा वापर केल्याचा संशय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -