घरक्रीडाटी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ जाहीर

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ जाहीर

Subscribe

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडक सर्व देश एकापाटोपाट एक आपला संघ जाहीर करत आहेत. भारताने काही दिवसांपूर्वी आपला संघ जाहीर केला. त्यानंतर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांनी आपला संघ जाहीर केला आहे.

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडक सर्व देश एकापाटोपाट एक आपला संघ जाहीर करत आहेत. भारताने काही दिवसांपूर्वी आपला संघ जाहीर केला. त्यानंतर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांनी आपला संघ जाहीर केला आहे. (Pakistan and Afghanistan announced cricket team for T20 World Cup)

ऑस्ट्रेलियात खेळला जाणाऱ्या 8व्या टी-20 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यांना 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने खेळले जाणार असून, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.

- Advertisement -

या टी-20 विश्वचशकासाठी अफगाणिस्तानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतून बाहेर झालेल्या अफगाणिस्तानच्या संघाची धुरा मोहम्मद नबी संभाळणार आहे.

अफगाणिस्तानच्या 5 खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता

- Advertisement -

विशेष म्हणजे, समीउल्लाह शिनवारी, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर जजई, करीम जनत आणि नूर अहमद यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसेच, केवळ अफसर जजईचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या शान मसूदला संघात स्थान

पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज शान मसूद याला संघात स्थान देण्यात आले आहे. मसूदने या वर्षी इंग्लंडपासून पाकिस्तानपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. मसूद अव्वल फळीतील फलंदाज आहे.

अफगानिस्तानचा संघ :

मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), रहमनुल्लाह गुरबज (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह ओमरजई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारूकी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, मुजीब उर रहमान, नवीन अहमद हक, कैस अहमद, राशिद खान, सलीम सफी, उस्मान गनी.

राखीव खेळाडू : अफसर जजई, शराफ़ुद्दीन अशरफ, रहमत शाह, गुलबदीन नायब.

पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदरी अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर


हेही वाचा – इंग्लंड संघचा पाकिस्ताना दौरा; सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरमधून देखरेख, दुकाने, कार्यालये बंद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -