BAN vs PAK : पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यातही मारली बाजी; २-० ने मालिकेवर केला कब्जा

बांगलादेश आणि पाकिस्तानमधील कसोटी मालिकेचा दुसरा सामना पाकिस्तानने ८ धावांनी आपल्या नावावर केला आहे

बांगलादेश आणि पाकिस्तानमधील कसोटी मालिकेचा दुसरा सामना पाकिस्तानने ८ धावांनी आपल्या नावावर केला आहे. या विजयासोबतच पाकिस्तानने दोन सामन्यांच्या मालिकेवर देखील २-० ने कब्जा केला. ढाकामध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पावसामुळे सामन्याच्या सुरूवातीच्या दिवशी खेळात व्यत्यय आला आणि नियोजित खेळ होऊ शकला नाही. त्यानंतरदेखील पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानचा फिरकीपटू साजिद खानने या सामन्यात सर्वाधिक १२ बळी घेतले आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याला शानदार कामगिरीच्या बदल्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तर आबिद अलीला मालिकावीर म्हणून घोषित केले.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही या सामन्यात गोलंदाजी केली आणि शेवटच्या काही षटकांत महत्त्वाच्या भागीदारीला मोडीत काढून आपल्या संघाला विजयाच्या आणखी जवळ नेले. त्यानंतर साजिद खानने राहिलेले बळी पटकावून सामन्यात आणि मालिकेत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. लक्षणीय बाब म्हणजे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पावसामुळे खूप व्यत्यय आला. मात्र पाकिस्तानने फक्त २१४.७ षटकांमध्येच हा सामना आपल्या नावावर केला. सामान्यत: एका कसोटी सामन्यात ४५० षटकांचा खेळ होण्याची संभावना असते.

पहिल्या डावात पाकिस्तानची शानदार फलंदाजी

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ४ बळी गमावून ३०० धावा बनवून आपला डाव घोषित केला. पाकिस्तानच्या चार फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. कर्णधार बाबरने सर्वाधिक ७६ धावा केल्या. याचे प्रत्युत्तर देताना बांगलादेशचा संघ ३२ षटकांत केवळ ८७ धावा करून सर्वबाद झाला. बांगलादेशकडून शांतो आणि शाकिब व्यतिरिक्त कोणताच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकला नाही. तर पाकिस्तानच्या साजिद खानने ८ बळी घेऊन बांगलादेशच्या संघाला चितपट केले.

पहिल्या डावात बांगलादेशचा संघ स्वस्तात परतल्यानंतर पाकिस्तानने फॉलोऑन दिले. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ ८४.४ षटकांत २०५ धावांवर सर्वबाद झाला आणि या सामन्यात संघाला ८ धावांनी पराभव पत्करावा लागला. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीम (४८), शाकिब अल हसन (६३), लिटिन दास (४५) यांनी साजेशी खेळी केली. मात्र या तीनही फलंदाजांची झुंज आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. पाकिस्तानकडून साजिद खान, शाहिन आफ्रिदी आणि हसन अली यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर कर्णधार बाबरने एक महत्त्वाचा बळी आपल्या नावावर केला.


हे ही वाचा : http://ICC Player Of The Month : ॲशेस मालिकेच्या सुरूवातीलाच ICC चे डेविड वॉर्नरला गिफ्ट