घरक्रीडारमेश पोवर यांची फेरनिवड नाही?

रमेश पोवर यांची फेरनिवड नाही?

Subscribe

महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांच्या फेरनिवडीची शक्यता कमी आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड होण्याची शक्यता कमी आहे. त्याला कारण आहे मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यामध्ये असलेले मतभेद. महिला टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये मिताली राजला वगळण्यात आलं. त्यानंतर भारताला इंग्लंडविरूद्धच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर मात्र मिताली राजला वगळण्यात आलं त्यावरून जोरात चर्चा रंगली. दरम्यान मिताली राजनं देखील मला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केल्यानं एकच खळबळ उडाली होती. यानंतर बीसीसीआयनं दोघांशी देखील संपर्क साधत प्रकरणावर दोघांची मतं जाणून घेतली. त्यावेळी मितालीशी डील करणं म्हणजे अवघड काम असल्याचं प्रशिक्षक रमेश पोवार यांनी म्हटलं. मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या प्रकरणामुळे महिला क्रिकेटमधील वाद चव्हाट्यावर आले. त्यात सुनिल गावस्कर यांनी देखील मितालीची बाजू उचलून धरली. त्यामुळे रमेश पोवार हे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी राहतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

पण, सध्या समोर येत असलेल्या माहितीवरून रमेश पोवार यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकत नाही. मिताली राज प्रकरणाचा परिणाम हा रमेश पोवार यांच्या निवडीवर होऊ शकतो. रमेश पोवार यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत असल्यानं बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्यासाठी अर्ज देखील मागवले गेले आहेत. रमेश पोवार देखील अर्ज करू शकतात. पण, त्यानंतर देखील त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

- Advertisement -

महिला विश्वचषकाच्या साखळी सामन्यामध्ये भारतीय संघानं जबरदस्त कामगिरी केली होती. पण इंग्ल्ंडविरोधात झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर हा सारा वाद पुढे आला होता.

वाचा – भारतीय महिला क्रिकेटमधील वाद चव्हाट्यावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -