घरमनोरंजनअभिनेता राजपाल यादवला ३ महिन्याची शिक्षा

अभिनेता राजपाल यादवला ३ महिन्याची शिक्षा

Subscribe

दिल्ली हायकोर्टाने अभिनेता राजपाल यादव याला ३ महिन्याची शिक्षा सुनावली आहे. त्याने ५ कोटींचे कर्ज न फेडल्यामुळे कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

दिल्ली हायकोर्टाने अभिनेता राजपाल यादव याला ३ महिन्याची शिक्षा सुनावली आहे. त्याने ५ कोटींचे कर्ज न फेडल्यामुळे कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. दिल्ली हायकोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर राजपाल याला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले. राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यांनी २०१० साली त्यांची निर्मिती असलेल्या अता पता लापता या चित्रपटासाठी कर्ज घेतले होते. गेल्या काही दिवसांमध्ये याच प्रकरणात कडकडडूमा कोर्टाने राजपाल यादवला १ कोटी ६० लाख रुपयांचा दंडदेखील आकारला होता. तसेच ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. तर कोर्टाने त्यांची पत्नी राधा यांच्यावर प्रत्येकी याचिका १० लाख रुपयांचा दंड सुनावला होता. या दोघांनाही चेक बाऊंससंबंधीच्या सात प्रकरणांमध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अशाप्रकारे त्यांना साधारण ११ कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यावेळी शिक्षा सुनावल्यानंतर त्वरीत त्यांना जामिन मिळाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -