घरक्रीडाRanji Trophy 2022 : रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर

Ranji Trophy 2022 : रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर

Subscribe

रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट (Ranji Trophy 2022 Knockouts) सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.

रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट (Ranji Trophy 2022 Knockouts) सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. शनिवारी हे वेळापत्रक जाहीर केले असून, नॉकआऊट (Knockouts) सामने दोन दिवस उशिराने सुरू होणार आहेत. यंदाच्या हंगामात बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघांनी नॉकआऊट फेरीत स्वतःचे स्थान पक्के केले.

सोमवार ६ जूनपासून ते शुक्रवार १० जूनपर्यंत रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या (Semi-Final) सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरू (Bangalore) येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २२ जून रोजी खेळवला जाणार आहे. इंडियन प्रिमीयर लीगच्या १५ व्या पर्वापूर्वी रणजी ट्रॉफीचे साखळी सामने खेळवले गेले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Ranji Trophy: सॅल्यूट! मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर रणजीमध्ये झळकावलं शानदार शतक, खेळाडूंसमोर ठेवला आदर्श

रणजी ट्रॉफीचे यंदाचे पर्व उशिराने सुरू

याशिवाय, कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रणजी ट्रॉफीचे यंदाचे पर्व उशिराने सुरू झाले होते. उपांत्यपूर्व फेरीतील सामने संपल्यानंतर १४ जून ते १८ जून या कालावधीत उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहे. त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना २२ जून ते २६ जून दरम्यान खेळला जाणार आहे.

- Advertisement -

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

  • पहिला उपांत्यपूर्व सामना – बंगाल विरुद्ध झारंखड
  • दुसरा उपांत्यपूर्व सामना – मुंबई विरुद्ध उत्तराखंड
  • तिसरा उपांत्यपूर्व सामना – कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश
  • चौथा उपांत्यपूर्व सामना – पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश

हेही वाचा – ‘तुझ्या दुधीचा…’; चहलच्या ‘त्या’ फोटोवर युवराज सिंहची हटके कमेंट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -