अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये जमावावर बेछूट गोळीबार, ३ लोकांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

गोळीबाराच्या घटनेमध्ये एक २५ वर्षीय महिला आणि २२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर ७ जखमींना जवळच्या थॉमस जेफरसन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Philadelphia shooting several injured and 3 killed in firing
अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये जमावावर बेछूट गोळीबार, ३ लोकांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये जमावावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. शनिवारी रात्री एका व्यक्तीने बंदूकीने जमावावर अंदाधुंद गोळीबार केलाय. या घटनेमध्ये एकूण तीन लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अमिरेकेच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार घटना मध्यरात्रीनंतर घडली. यात अनेक बंदूकधारी सामील असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण १४ जण गंभीर जखमी झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे.

फिलाडेल्फियामध्ये झालेल्या गोळीबारात बंदूक जप्त करण्यात आली आहे. परंतु हल्ला करणारा व्यक्तीला अटक करण्यात आले आहे का? याबाबत स्पष्टता नाही. परंतु गोळीबार करणाऱ्या ठिकाणाला सील करण्यात आले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे बंदुकधारी व्यक्तीचा शोध सुरू होता. शूटरपैकी एक अमेरिकन स्ट्रीटवर दक्षिणेकडे धावताना दिसला. गोळीबार झालेल्या घटनास्थळी दोन बंदूका सापडल्या आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

गोळीबाराच्या घटनेमध्ये एक २५ वर्षीय महिला आणि २२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर ७ जखमींना जवळच्या थॉमस जेफरसन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर पाच जणांना पेनसिल्व्हेनिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी तीन जणांना पेन प्रेस्बिटेरियन मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. दरम्यान अमेरिकेमध्ये गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक घटना समोर येत आहेत. २५ मे रोजी टेक्सासमधील एका शाळेत तरुणाने गोळीबार केला होता यामध्ये १९ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा : बांगलादेशात भीषण स्फोट; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, ४५० पेक्षा जास्त जखमी