घरक्रीडाPakistan Super League: राशिद खानने सोडली टीमची साथ, खेळाडूंनी दिला गार्ड ऑफ...

Pakistan Super League: राशिद खानने सोडली टीमची साथ, खेळाडूंनी दिला गार्ड ऑफ ऑनर

Subscribe

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसणार नाहीये. कारण २३ वर्षीय राशिद खानने १९ फेब्रुवारी रोजी पीएसएलचा शेवटचा सामना खेळला आहे. त्याने शेवटचा सामना इस्लामाद युनायटेड विरूद्ध खेळला आहे. राशिद आता बांगलादेशविरूद्धच्या होणाऱ्या आगामी मालिकांमध्ये अफगाणिस्तान संघाचे नेतृत्त्व करणार आहे.

राशिद खानने पीएसएलमधील शेवटच्या सामन्यात ४ ओव्हर्समध्ये १९ धावा देत २ गडी बाद केले. सामना संपल्यानंतर संघातील खेळाडूंनी राशिदला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर राशिद खान आणि डावखुरा गोलंदाज शाहीन आफ्रीदीने ऐकमेकांना घट्ट मिठी मारली. त्याचदरम्यान राशिद खूपच भावूक होताना दिसला.

- Advertisement -

लाहोर कलंदर्ससाठी राशिदची उत्कृष्ट कामगिरी

राशिदने लाहोर कलंदर्स संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. ९ सामन्यांमध्ये त्याने १७.३० च्या सरासरीने संघासाठी १३ विकेट्स घेतल्या आहेत. स्पर्धेदरम्यान, खानने करांची किंग्जचा कर्णधार बाबर आझमला त्रास दिला होता. त्यानंतर बाबर आणि राशिद पाच वेळा आमने-सामने आले होते. परंतु यामध्ये राशिद नेहमीच बाबरच्या अग्रस्थानी राहीला.

- Advertisement -

राशिदला गार्ड ऑफ ऑनर देताना लाहोरचे खेळाडूही भावूक झाले होते. आम्हाला त्याची खूप आठवण येईल, असं लाहोर संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने म्हटलं. तसेच त्याने केलेल्या कर्तृत्वासाठी आफ्रिदीने शुभेच्छा दिल्या.

राशिद खान अफगाणिस्तान संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. फक्त ५६ सामन्यांत एकूण १०६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज राशिद ठरला आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ७७ सामन्यांत १८.४९ च्या सरासरीने १४६ विकेट्स घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त कसोटी करिअरमध्ये देखील त्याने एकूण ३४ विकेट्स घेतल्या आहेत.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट, मुंबईत मृत्यूची संख्या शून्यावर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -