घरक्रीडाराशिदने गोल्फ स्टीकने मारला हेलिकॉप्टर शॉट, पीटरसन ट्रोल करताना म्हणाला...

राशिदने गोल्फ स्टीकने मारला हेलिकॉप्टर शॉट, पीटरसन ट्रोल करताना म्हणाला…

Subscribe

राशिदने बॅटने नाही, तर गोल्फ स्टीक हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला.

अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. राशिदने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केल्याने असंख्य भारतीय क्रिकेटप्रेमी त्याचे चाहते झाले आहेत. राशिदने आतापर्यंत २६५ टी-२० सामन्यांत ३७० विकेट घेतल्या असून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा सहावा क्रमांक लागतो. परंतु, राशिद केवळ त्याच्या लेगस्पिनसाठी ओळखला जात नाही. तो उपयुक्त फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. फलंदाजी करताना तो बरेचदा हेलिकॉप्टर शॉटचा वापर करतो. आता त्याने हा हेलिकॉप्टर शॉट बॅटने नाही, तर गोल्फ स्टीक मारण्याचा प्रयत्न केला आहे.

बरेचदा हेलिकॉप्टर शॉटचा वापर

राशिदने जगभरातील विविध टी-२० स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना काही मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. या खेळींदरम्यान तो बरेचदा हेलिकॉप्टर शॉटचा वापर करतो. हेलिकॉप्टर शॉट म्हटल्यावर आजही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण होते. परंतु, राशिदने हा शॉट आता अधिक लोकप्रिय केला आहे. आता त्याने गोल्फ स्टीकने हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि याचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

- Advertisement -

पीटरसनने दिले मजेशीर उत्तर

तुम्ही कधी हेलिकॉप्टर शॉट गोल्फमध्ये मारण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवालही राशिदने चाहत्यांना विचारला. त्यावर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने मजेशीर उत्तर दिले. पुढच्या वेळी स्विच हिट मारणार का? असे विचारत पीटरसनने राशिदला मजेशीर पद्धतीने ट्रोल केले. राशिद नुकताच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत लाहोरकडून खेळला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -