घरक्रीडाRiyan Parag : 4,4,6,4,6 शेवटच्या षटकात रियान परागची तुफानी खेळी

Riyan Parag : 4,4,6,4,6 शेवटच्या षटकात रियान परागची तुफानी खेळी

Subscribe

राजस्थान रॉयल्स संघातील मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग याच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थानने 185 धावा केल्या. यामध्ये रियान परागने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 45 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या.

राजस्थान : इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) आजचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 186 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्ससमोर ठेवले आहे. राजस्थान रॉयल्स संघातील मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग याच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थानने 185 धावा केल्या. यामध्ये रियान परागने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 45 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या. (Riyan Parag hits 84 not out againts delhi capitals Ipl Match 2024 RR vs DC Rajasthan Royals target of 186 to win)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरला. सुरूवातील राजस्थानच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. मात्र. मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग याच्या फलंदाजीमुळे राजस्थानची धावसंख्या 185वर गेली.

- Advertisement -

रियान परागने एनरिक नॉर्तजेची चांगलीच धुलाई केली. दिल्लीकडून अखेरचे षटक घेऊन आलेल्या नॉर्तजेच्या या षटकात परागने 25 धावा खेचल्या. त्याने 4,4,6,4,6 आणि अखेरच्या चेंडूवर 1 धाव काढली.

दरम्यान, या सामन्यात राजस्थानकडून फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वाल (5), जोस बटलर (11), संजू सॅमसन (15), आर अश्विन (29), ध्रुव जुरेल (20) आणि शिमरोम हेटमायरने नाबाद 14 धावा केल्या. दिल्लीकडून प्रत्येक गोलंदाजाला 1-1 बळी घेण्यात यश आले.

- Advertisement -

दिल्लीचा संघ –रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद आणि एनरिक नॉर्तजे.

राजस्थानचा संघ – संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.


हेही वाचा – IPL 2024 : रोहित, हार्दिकसोबत फोटो शेअर करणारी ती तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -