घरठाणेमहसूल विभागाकडून तात्काळ पंचनामा 

महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामा 

Subscribe

बाधित शेतकर्‍याला दिलासा, एक पोकलेन आणि दोन हायवा डंपर सील, दैनिक आपलं महानगर इम्पॅक्ट

शहापूर तालुक्यातील गोलभन येथे स्थानिक शेतकर्‍यांच्या खरीप शेतजमिनीतून रेल्वे ठेकेदाराने विना परवानगी माती चोरी केल्याचे वृत्त 27 मार्च रोजी दैनिक आपलं महानगर मध्ये प्रसारित झाले होते. या वृत्ताची दखल महसूल विभागाने तातडीने घेतली आहे. नवी मुंबई येथील शरवी कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारावर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या मालकीची एक पोकलेन, दोन हायवा डंपर सील करण्यात आल्या आहेत. तर 259 ब्रास मातीचा पंचनामा देखील करण्यात आला आहे. शेतकर्‍याला तात्काळ न्याय मिळाल्याने त्याने समाधान व्यक्त करत दैनिक आपलं महानगरचे मनोमन आभार मानले आहेत. याप्रकरणी शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत ही कारवाई केली आहे.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गाच्या तिसर्‍या आणि चौथ्या मार्गिकेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.या कामासाठी आसनगावचे पुढे जमीन असमतोल असल्याने भराव करण्यासाठी मातीची प्रचंड गरज आहे. यासाठी अंदाजपत्रकात माती भरावाचे मूल्य समाविष्ट करण्यात आले असताना ठेकेदार माती विकत न घेता रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीतून यांत्रिक मशीनचे माध्यमातून माती चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत बाधित शेतकर्‍याने महसूल विभाग आणि पोलिसात तक्रार दाखल केली होती. मध्य रेल्वेवरील खर्डी रेल्वे स्थानक शेजारी असलेल्या गोलभन गावाच्या शिवारातील नितीन घरत या शेतकर्‍याच्या सर्वे क्रमांक 40 या भातशेती पिकणार्‍या शेतामधील माती रात्रीच्या सुमारास यांत्रिकी मशीनद्वारे चोरल्याचे वृत्त 27 मार्च रोजी दैनिक आपलं महानगरमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या बातमीची दखल घेण्यात आली आणि कारवाई करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -