घरक्रीडाRoss Taylor : शेवटची ओव्हर, शेवटच्या बॉलला विकेट अन् टीमचा विजय, रॉस...

Ross Taylor : शेवटची ओव्हर, शेवटच्या बॉलला विकेट अन् टीमचा विजय, रॉस टेलरचा कसोटी क्रिकेटला अलविदा

Subscribe

एखाद्या खेळाडूच्या क्रिकेट करियरमध्ये खेळाला अलविदा करण्याचा क्षण हा अतिशय भावूक असतो. आपल्या टेस्ट करिअरच्या शेवटच्या बॉलवरच विकेट मिळतानाच संघाचाही विजय होणे यासारखी आयुष्यभर जगता येणारी आठवण नाही. न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाज असलेल्या रॉस टेलरसोबत अशीच गोष्ट घडली आहे. बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉस टेलरने बॉलिंग करताना आपल्या शेवटच्या सामन्यात शेवटच्या बॉलवर विकेट घेतली. या विकेटसह न्यूझीलंडच्या संघाने बांगलादेशविरोधात विजयही मिळवला. (Ross taylor got wicket on his last over last ball video Nz vs Ban cricket retirement)

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील क्राइस्टचर्त येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रॉस टेलर हा आपला शेवटचा कसोटी सामना खेळत होता. टेस्ट मॅचच्या शेवटच्या दिवशी जेव्हा बांगलादेशच्या नऊ विकेट्स गेल्या, तेव्हा रॉय टेलरकडे गोलंदाजी देण्यात आली. या गोलंदाजीतच रॉस टेलरने एका नव्या इतिहासाची नोंद केली.

- Advertisement -

रॉस टेलरच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या इबादत हुसैनने हवेतच एक शॉट खेळला. हुसैनचा मारलेल्या फटक्यानंतर बॉल थेट कॅप्टन टॉम लॅथमच्या हातात गेली. त्यानंतर हुसैन आऊट झाला. रॉस टेलरने आपल्या करिअरच्या शेवटच्या बॉलवर विकेट घेतला. रॉस टेलरच्या टेस्ट करिअरमध्ये ही अवघी तिसरी विकेट होती. त्याआधी हरभजन सिंह आणि श्रीसंतची विकेट टेलरने घेतली आहे.

- Advertisement -

बांगलादेशला पराभूत करत न्यूझीलंडच्या टीमने मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे. याआधी बांगलादेशनेही चांगली करत न्यूझीलंडला त्यांच्याच देशात पराभूत केले होते. रॉस टेलरने या सिरिजला सुरूवात करताना स्पष्ट केले होते, की क्रिकेट करिअरमधील ही शेवटची सिरीज असणार आहे.

रॉस टेलरच्या करिअरमीधील तीन विकेट्स

१. हरभजन सिंह
२. एस श्रीसंत
३. इबादत हुसैन

न्यूझीलंड क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये रॉस टेलरची गणना होते. न्यूझीलंडसाठी रॉस टेलरने एकुण १११ सामने खेळले. त्यामध्ये ४४.७६ च्या सरासरीने टेलरने ७६५५ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ च्या सरासरीने ८५८१ धावा केल्या आहेत. रॉस टेलरने २००६ मध्ये डेब्यू केला होता. अखेर रॉस टेलरच्या १५ वर्षांचे करिअर संपुष्टात आले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -