घरक्रीडारैनाच्या जागी IPL मध्ये खेळणार 'हा' मराठमोळा फलंदाज!

रैनाच्या जागी IPL मध्ये खेळणार ‘हा’ मराठमोळा फलंदाज!

Subscribe

आता समस्त क्रिकेटप्रेमींच लक्ष असणारे IPL लवकरच सुरू होणार आहे. पण यादरम्यान अनेक विचित्र गोष्ट घडत आहेत. चैन्नई सुपर किंग्ज संघातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली त्यानंतर चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना याने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आणि तो भारतात परतला. सुरूवातीला त्याच्या या माघारीमागे वैयक्तिक कारण आहे असं सांगितलं जात होतं. पठाणकोटमध्ये त्याच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला आणि कोरोनाची भीती अशी दोन कारण असल्याचं सांगितलं गेलं. मात्र आता वेगळचं कारण समोर येत आहे.

सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याच्या मागे त्याच्यात आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात रूमवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचं वृत्त समोर आलं. संपूर्ण IPLभर बायो-बबलमध्ये राहणे रैनाला थोडे भीतीदायक वाटत होते. त्याला धोनीली देण्यात आलेली किंवा त्याच्या रूमसारखीच बाल्कनीवाली रूम वास्तव्यास हवी होती. धोनीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि थेट स्पर्धेतून माघार घेतली असं सांगितलं जातं आहे.

- Advertisement -

ऋतुराज गायकवाडला मिळणार संधी

CSK चे मालक एन श्रीनिवास यांनी रैनाच्या जागी संघाकडे पर्यायी खेळाडू तयार असल्याचे सांगितले. आऊटलूकशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ‘ऋतुराज गायकवाड’ हा एक अप्रतिम फलंदाज आहे. त्याला आता नक्कीच संघात संधी मिळेल. ऋतुराज प्रतिभावंत फलंदाज असल्याने तो कदाचित यंदाच्या IPLचा स्टार खेळाडू म्हणूनही नावारूपास येऊ शकतो.” सध्या CSKच्या ज्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे, त्यात एक ऋतुराज गायकवाडदेखील आहे.

तडकाफडकी माघार घेणं धक्कादायक

रैनाचं असं तडकाफडकी माघार घेणं साऱ्यांसाठी धक्कादायक आहे, पण संघाचे खेळाडू या धक्क्यातून लवकरच सावरतील. यशस्वी झाल्यावर काही लोकांच्या डोक्यात खूपच हवा जाते, त्यातला हा प्रकार आहे. पण संघातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. धोनी सारं काही सांभाळून घेऊ शकतो. अजून तरी IPLचा हंगाम सुरू झालेला नाही. पण लवकरच रैनाला समजेल की त्याने स्वत:चे किती मोठे आर्थिक नुकसान केले आहे”, असेही श्रीनिवासन म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘काळे कच्छेवाला’ गँगने केली सुरेश रैनाच्या काकांची हत्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -