घरक्रीडाघटस्फोटांच्या चर्चेदरम्यान सानिया आणि शोएब 'या' कार्यक्रमात दिसणार एकत्र

घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान सानिया आणि शोएब ‘या’ कार्यक्रमात दिसणार एकत्र

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, सानिया आणि शोएबच्या एका नव्या कार्यक्रमाची सोशल मीडियावरुन घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

या कार्यक्रमामध्ये टेनिसपटू सानिया मिर्झा पती शोएब मलिकसोबत दिसून येणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाच्या घोषणेसोबतच कार्यक्रमाचे नाव देखील जाहीर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘द मिर्झा मलिक शो’ असून सध्या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच हा कार्यक्रम पाकिस्तानमधील एका चॅनलवर स्ट्रिम होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by UrduFlix (@urduflixofficial)

- Advertisement -

मात्र, नुकत्याच काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील सुरु आहेत. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार सानिया आणि शोएबच्या आगामी कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांनी हा पब्लिसीटी स्टंट होता.

‘द मिर्झा मलिक शो’ टॉक शोमध्ये सानिया शोएब एकत्र
पाकिस्तानातील काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब मलिकचे विवाहबाह्य संबंध असल्याचं सांगितलं जात होतं. मागील काही दिवसांपूर्वी शोएबने पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री आयशा उमरसोबत एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यामुळे अनेकांच्या मते या दोघांच्या घटस्फोटामागे आयशा उमरचं नाव जोडलं जात आहे. सानिया आणि शोएबच्या आगामी कार्यक्रमातून याबाबत नक्कीच खुलासा होऊ शकतो.

- Advertisement -

2010 झालं होतं लग्न
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि यांचे लग्न 12 एप्रिल 2010 झाली हैदराबादमध्ये झाले होते. त्यांना इजहान नावाचा एक मुलगा आहे. त्याचा जन्म 2018 मध्ये झाला होता. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या केमिस्ट्रीने एके काळी प्रत्येकाला आश्चर्यचकित करुन टाकले होते.


हेही वाचा :

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -