घरमहाराष्ट्रकौन किसके शादी मे जा रहा है, लोकांना माहितीय; मुख्यमंत्री शिंदेंचा आव्हाडांना टोला

कौन किसके शादी मे जा रहा है, लोकांना माहितीय; मुख्यमंत्री शिंदेंचा आव्हाडांना टोला

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे आणि कळवा शहरातील वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन होणार आहे. मात्र या पुलाच्या उद्घाटनावरुन शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘बेगामी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशी टीका केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, कौन किसके शादी मे जा रहा है, हे लोकांना माहिती असल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

आव्हाडांच्या वैयक्तिक खर्चातून हा प्रकल्प झाला नाही

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणी वेगळं नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री पुलाचं उद्धाटन करणार आहे. यासाठी सर्व खर्च महापालिकेने केला आहे. त्यांच्या वैयक्तिक खर्चातून हा प्रकल्प झाला नाही. प्रयत्न तर सर्वच करतात, आमदार, खासदार, महापौर करतात, त्यामुळे सगळ्यांच्याच प्रयत्नातून प्रकल्प होत असतात. पण प्रकल्प करण्याची दानत आणि इच्छाशक्ती आमच्याकडे आहे, त्यामुळे ठाण्यात अनेक प्रकल्प आम्ही सुरु केले आहे, आणि आम्ही कधी दुजाभाव केला नाही. या मतदार संघात कोणाचा आमदार आहे, त्या मतदार संघात कोणाचा आहे असं करून केलं नाही. म्हणून कोट्यावधी रुपयांची काम ठाणे महापालिका हद्दीत केली आहेत. त्यामुळे लोकांना माहित आहे की, कौन किसके शादी मे जा रहा है वो… असं म्हणत त्यांनी आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सर्वांना न्याय देण्याचं काम या राज्य सरकारकडून होत आहे म्हणून लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास ठेवत आहे. कळवा नाक्यावर जी वाहतूक कोंडी होत होती ती आता दूर होईल लोकांना दिलासा मिळेल. विकासाच्या प्रकल्पांना राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेगेळ्या अगोदर हे प्रकल्प कार्यानिवित करणार आहोत ज्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, ज्यामुळे युद्ध पातळीवर काम सुरु आहेत जे लोकंही पाहत आहेत. त्यामुळे लोकं आमच्याकडे येत आहे.


हेही वाचा : अंधारेंच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णयामुळेच आमच्यात मतभेद, वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -