घरक्रीडाIPL 2023 : शुबमन गिलला जीवनदान मिळाल्यानंतर संधीचं केलं सोनं, मुंबईचं कुठं चुकलं?

IPL 2023 : शुबमन गिलला जीवनदान मिळाल्यानंतर संधीचं केलं सोनं, मुंबईचं कुठं चुकलं?

Subscribe

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल(शुक्रवार) क्वालिफायर -२ चा सामना पार पडला. यावेळी या निर्णायक सामन्यात मुंबईने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा पहिला निर्णय घेतला. या संपूर्ण हंगामात मुंबईने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. परंतु या सामन्यात मुंबईने मोठी चुक केली. गुजरातचा वेगवान फलंदाज शुभबन गिलने आपल्या उत्कृष्ट खेळीसह मुंबईचा धुव्वा उडवला. यावेळी गिलला एक, दोन नाही तर तब्बल ३ वेळी जीवनदान मिळालं आणि त्यानं त्या संधीचं सोनं केलं.

- Advertisement -

शुबमन गिलने ओपनिंग करत शतकी खेळी केली आणि या सामन्यात गिलने १२९ धावा ६० चेंडूत बनवल्या. संपूर्ण हंगामात जास्त धावा बनवणारा तो खेळाडू ठरला आहे. मुंबईने शुबमन गिल याच्या २ कॅच सोडल्या. तर यष्टीरक्षक इशान किशन याने १ स्टम्पिंग सोडली. त्यामुळे ही चूक मुंबईला चांगलीच भारी पडलीये. शुबमनने या जीवनदानाचा फायदा घेत चौफेर फटकेबाजी केली.

- Advertisement -

मुंबईचं कुठं चुकलं?

शुबमन गिलला ३० धावांवर पहिलं जीवनदान मिळालं. गुजरातच्या डावातील सहावी ओव्हर क्रिस जॉर्डन टाकत होता. या ओव्हर्समधील पाचव्या बॉलवर शुबमन गिलने फटका मारला. गिलने मारलेला फटका टीम डेव्हिडच्या दिशेने गेला. टीम डेव्हिड याने शानदार प्रयत्न करत हवेत झेप घेतली. परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. कुमार कार्तिकेय याच्या बॉलिंगवर दुसरं जीवनदान मिळालं. तसेच इशान किशनला स्टम्पिंग करण्याची काहीशी संधी होती. परंतु ती संधी त्याने गमावली. त्यामुळे गिलसह गुजरातला त्याचा चांगलाच फायदा झाला आणि गिलने शतकी खेळी करत मुंबईला दणका दिला.


हेही वाचा : मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास; गुजरातचा दणदणीत विजय, आता चेन्नईसोबत फायनल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -