घरक्रीडाभारत वि. केनिया फुटबॉल सामन्यापूर्वीच मैदान 'हाऊसफुल'

भारत वि. केनिया फुटबॉल सामन्यापूर्वीच मैदान ‘हाऊसफुल’

Subscribe

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने काल ट्विटर वरून भारतीय नागरिकांनी फुटबॉल सामन्याला मैदानात उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, अशी विनंती केली होती. त्याच्या या विनंतीला क्रीडाप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज मुंबईत होत असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपच्या भारत विरुद्ध केनिया सामन्याचे अठरा हजार तिकिटे विकली गेली आहेत. पहिल्या सामन्यात फक्त अडीच हजार तिकिटे विकली गेली होती. सुनील छेत्रीच्या आवाहनाला दाद देत यावेळी प्रेक्षकांनी हे मैदान हाऊसफुल करुन दाखवले आहे.

आमचा खेळ तुम्हाला कदाचित युरोपियन संघा इतका महत्त्वाचा वाटत नसेल. आमच्या खेळांवर तुम्ही टीका करा किंवा कौतुक करा. मात्र मैदानात येऊन सामना पहा, असे भावनिक आवाहन सुनील छेत्री याने कालच ट्विटरद्वारे केले होते.
भारताचा पहिला सामना चायनीज ताईपेइ संघाशी झाला होता. या सामन्यात भारताने ५-० असा मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. कर्णधार सुनीलने तर हॅट्रिक गोल केले होते. हा सामना पाहण्यासाठी मैदानात केवळ २५६९ प्रेक्षक उपस्थित होते. १८ हजारांची क्षमता असणाऱ्या मैदानात केवळ २५६९ तुटपुंज्या प्रेक्षकांच्या हजेरीने निराश झालेल्या सुनीलने विडिओद्वारे आपली खंत व्यक्त केली होती.

- Advertisement -

सुनील छेत्रीच्या व्हिडिओला खेळाडूंपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांचा पाठिंबा

सुनीलने केलेल्या विनंती व्हिडिओला सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला. यासोबतच स्पेनच्या प्रसिध्द अशा ‘ला लीगा’ या प्रिमियर लीगने देखील ट्विटर वरून आपला पाठींबा दिला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -