दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20मध्ये सूर्यकुमार यादवच्या रोहित, विराटपेक्षा अधिक धावा; राहुलही फॉर्मात

टी-20 विश्वचषकातील भारताचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. मागील दोन सामन्यात दमदार विजय मिळवल्याने भारतीय संघ चांगलाच फॉर्मात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आजच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला सावध खेळी करावी लागणार आहे.

टी-20 विश्वचषकातील भारताचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. मागील दोन सामन्यात दमदार विजय मिळवल्याने भारतीय संघ चांगलाच फॉर्मात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आजच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला सावध खेळी करावी लागणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघही गेल्या अनेक महिन्यांपासून फॉर्मात आहे. परंतु, असे असले तरी, आजच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडं जड असल्याच्या चर्चा क्रिकेट विश्वात रंगल्या आहेत. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार यादव आणि के. एल. राहुलच्या धावा सर्वाधिक आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातही आफ्रिकेविरुद्धचा फॉर्म हे दोन फलंदाज कायम ठेवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Suryakumar Yadav And K L Rahul Have Most Runs Against South Africa In T20 Matches)

सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील टॉप 4 फलंदाजांमध्ये के. एल. राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावांचा समावेश आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये, KL राहुल वगळता, इतर सर्व फलंदाज लयीत आहेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंतचा त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे.

दरम्यान, के. एल. राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच, सूर्यकुमार यादवनेही या संघाविरुद्ध रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा चांगल्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे रविवारी पर्थ येथे होणाऱ्या सामन्यात या सर्व फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

रोहित शर्मा

 • भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक T20 सामने खेळणारा खेळाडू म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा
 • रोहित शर्माने या संघाविरुद्ध 16 सामन्यांच्या 15 डावात 28.92 च्या सरासरीने 405 धावा केल्या आहेत ज्यात एक
 • शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
 • त्याची सर्वोत्तम धावसंख्या 106 धावा आहे.

विराट कोहली

 • विराट कोहली भारतातर्फे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे
 • विराटने या संघाविरुद्ध 12 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 38.25 च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत, ज्यात दोन
 • अर्धशतकांचा समावेश आहे.
 • सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 72 आहे.

सूर्यकुमार यादव

 • सूर्यकुमार यादवने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या 3 डावात 59.50 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत.
 • या संघाविरुद्ध सूर्यकुमारची सरासरी विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा खूपच चांगली आहे.
 • या सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 195.08 आहे आणि त्याच्या नावावर दोन अर्धशतकांची नोंद आहे.
 • या संघाविरुद्ध सूर्यकुमारची सर्वोत्तम धावसंख्या 61 धावा आहे.

के. एल. राहुल

 • के. एल. राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे.
 • केएल राहुलने या संघाविरुद्ध 2 सामने खेळले आहेत.
 • दोन्हीमध्ये अर्धशतके झळकावली आहेत.
 • राहुलने 2 डावांमध्ये 108.00 च्या सरासरीने 108 धावा केल्या आहेत.
 • त्याचा स्ट्राइक रेट 128.57 आहे.
 • सर्वोत्तम धावसंख्या 57 आहे.

हेही वाचा – भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये सुपर 12 फेरीतला होणार महत्त्वाचा सामना