घरमहाराष्ट्रअमरावतील दुमजली इमारत कोसळली; 5 जणांचा मृत्यू; दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

अमरावतील दुमजली इमारत कोसळली; 5 जणांचा मृत्यू; दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Subscribe

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अमरावती शहराच्या मुख्य बाजारपेठेत ही इमारत आहे. याठिकाणी सध्या महापालिका अधिकारी, अग्निशमन दलाच्या पथकाकडून मदतकार्य सुरु आहे. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत ही मुख्य बाजारातील प्रभास टॉकिज च्या बाजूलाच आहे. दोन मजल्याच्या या जुन्या इमारतीला पालिकेने सात वेळा नोटीस बजावल्या होत्या. यानंतर इमारतीचे वरचे मजले रिकामी करण्यात आले. मात्र इमारतीखालील दुकानं सुरु होती. यातील एका दुकानात सिलींगचे काम सुरु असताना ही इमातर कोसळल्याची माहिती समोर येते आहे.

- Advertisement -

यातील बॅग हाऊस या दुकानात मालक आणि काही ग्राहक उपस्थित होते, त्यामुळे मालक आणि काही ग्राहक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य जलदगतीने करता यावे यासाठी पोलिसांनी परिसर सील केला आहे. या घटनेत आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन अद्याप ढिगाऱ्यात अडल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्य जलदगतीने करता यावे यासाठी पोलिसांनी परिसर सील केला आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आहेत.


‘तुमची मुलगी बेशुद्ध पडलीय’ बलात्कार करणाऱ्या आरोपींचा वडिलांना फोन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -