घरक्रीडाटीम इंडिया उपांत्य फेरीसाठी तयार!

टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी तयार!

Subscribe

भारतीय संघाने विश्वचषकाच्या आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. हा भारताचा या स्पर्धेतील सातवा विजय होता. तसेच दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यामुळे भारत गुणतक्त्यात अव्वल स्थानी विराजमान झाला. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी आणि ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असे विधान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केले.

आमच्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच आमच्या संघाने इतके दमदार प्रदर्शन केले आहे. आम्ही उपांत्य फेरीसाठी तयार आहोत. आमचा संघ एका खेळाडूवर अवलंबून नाही. सर्वच खेळाडूंना मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावण्यात यश आले आहे आणि म्हणूनच कोणत्याही खेळाडूला संघातून बाहेर काढण्याआधी संघ व्यवस्थापनाला फार विचार करावा लागत आहे. उपांत्य फेरीआधी संघामधील स्थानांसाठी स्पर्धा असणे, ही संघासाठी खूपच चांगली गोष्ट आहे, असे बुमराह म्हणाला.

- Advertisement -

जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या बुमराहने या विश्वचषकात आतापर्यंत १७ विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याचे कौतुक होत आहे. मात्र, मी कौतुक किंवा टीका याचा फार विचार करत नाही, असे बुमराह म्हणाला. मी खरे सांगू तर कौतुक किंवा टीका याचा फार विचार करत नाही. मी फक्त सराव, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे आणि संघासाठी काय करू शकतो, या गोष्टींचाच विचार करतो, असे बुमराहने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -