घरक्रीडाभारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; पाहा सामना कधी, कुठे खेळवला जाणार?

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; पाहा सामना कधी, कुठे खेळवला जाणार?

Subscribe

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यासोबत टी-२० सामने खेळण्यानंतर भारतीय संघ (Indian Cricket Team) इंग्लंड (England) विरुद्ध खेळणार आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) आहे.

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यासोबत टी-२० सामने खेळण्यानंतर भारतीय संघ (Indian Cricket Team) इंग्लंड (England) विरुद्ध खेळणार आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) आहे. या दौऱ्यावेळी कोणता सामना कधी होणार याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ इंग्लंडशी एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर येत्या १ जुलैपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. (team india tour of england 2022 squad schedules venue)

इंग्लंड- भारत टी-२० मालिका वेळापत्रक

- Advertisement -

सामना                 तारीख         ठिकाण
पहिला टी-२० सामना        ७ जुलै       एजेस बाउल
दुसरा टी-२० सामना         ९ जुलै        एजबॅस्टन
तिसरा टी-२० सामना         १० जुलै       ट्रेंट ब्रिज

इंग्लंड – भारत वनडे मालिका वेळापत्रक

- Advertisement -

सामना                          तारीख        ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना             १२ जुलै        ओव्हल
दुसरा एकदिवसीय सामना              १४ जुलै        लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना             १७ जुलै        मँचेस्टर

भारतीय संघ:

मयांक अगरवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा. रोहित शर्मा

रोहितच्या जागी मयांक अग्रवालची संघात वर्णी

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रोहितच्या जागी मयांक अग्रवालची (Mayank Agarwal) संघात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, बीसीसीआय रोहित शर्माच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.


हेही वाचा – इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -