घरक्रीडाभारताने कसोटी सामने खेळले नाहीत तर कसोटी क्रिकेट संपेल - चॅपेल

भारताने कसोटी सामने खेळले नाहीत तर कसोटी क्रिकेट संपेल – चॅपेल

Subscribe

कसोटी क्रिकेटवर सध्या संकट आहे. जर भारताने कसोटी क्रिकेट खेळणं सोडलं तर कसोटी क्रिकेट संपेल, असं ग्रेग चॅपेल म्हटलं आहे.

माजी भारतीय प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी कसोटी क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोविड-१९ साथीच्या रोगामुळे कसोटी क्रिकेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि जर भारताने मदत केली नाही तर कसोटी क्रिकेट संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवनसाठी भारत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एका फेसबुक चॅटमध्ये ते म्हणाले की, “भारत ज्या दिवशी कसोटी क्रिकेट सोडेल, त्या दिवशी कसोटी क्रिकेट संपेल. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड व्यतिरिक्त इतर देशांमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी युवा क्रिकेटपटूंमध्ये गुंतवणूक करताना मला दिसत नाही. असे नाही की मी टी-२० च्या विरोधात आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला ‘अल्टिमेट क्रिकेट’ म्हटलं आहे, त्यामुळे कसोटी क्रिकेट टिकेल अशी अपेक्षा आहे. चॅपेल यांची भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांची मुदत होती. आपल्या ‘प्लेइंग इट माय वे’ या पुस्तकात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चॅपेलला एक रिंगमास्टर म्हटलं होतं, ज्यांनी खेळाडूंची चिंता न करता आपल्या कल्पना लादल्या. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केलं आणि सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून वर्णन केलं.

- Advertisement -

हेही वाचा – धावांचा पाठलाग करताना सचिनपेक्षा विराट सरस!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -