घरक्रीडाIPL 2019 : असा असेल मुंबई इंडियन्सचा संघ

IPL 2019 : असा असेल मुंबई इंडियन्सचा संघ

Subscribe

२०१९ साली होणार्‍या आयपीएलसाठी संघ मालकांनी संघात कायम ठेवलेले आणि करारमुक्त केलेले अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

२०१९ साली होणार्‍या आयपीएलसाठी सर्व संघमालकांनी जय्यत तयारी सुरु केली असून आतापर्यंत प्रत्येक संघाने आपल्या संघातील महत्वाच्या खेळाडूंना कायम राखत, काही खेळाडूंना करारमुक्त केले आहे. आयपीएलमध्ये चाहत्यांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असलेल्या संघांपैकी एक मुंबई इंडियन्सनेही आगामी हंगामासाठी तब्बल १८ खेळाडूंना संघात कायम राखले आहे. याचसोबत १० खेळाडूंना मुंबई इंडियन्सने करारमुक्त केले आहे. करारमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा जे.पी.ड्युमिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा समावेश आहे. पॅट कमिन्स मागच्या हंगामात दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. याआधी मुंबई इंडियन्सने अकिला धनंजया आणि मुस्तफिजूर रेहमान यांना करारमुक्त केले आहे.

मुंबई इंडियन्सने कायम राखलेले खेळाडू –

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, अ‍ॅडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ

 करारमुक्त केलेले खेळाडू –

सौरभ तिवारी, प्रदीप सांगवान, मोहसीन खान, एमडी. निधेश, शरद लुंबा, तेजिंदर सिंह धिल्लाँ, जे.पी.ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान, अकिला धनंजया

चेन्नईचे सर्वाधिक २२ खेळाडू कायम

पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने मागील मोसमातील २२ खेळाडू कायम राखले असून, केवळ तीन खेळाडूंना मुक्त केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी होती. बंदीनंतर चेन्नईने हैदराबादवर मात करून या वर्षीचे विजेतेपद पटकावले. या विजयी संघातील २२ खेळाडू चेन्नईने कायम राखले असून, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडसह भारताचे कनिष्क सेठ आणि क्षीतिज शर्मा यांना मुक्त केले आहे. पुण्याचा केदार जाधव चेन्नई संघात कायम आहे. संघात किती खेळाडू कायम राखणार आहेत, हे संघ मालकांना १५ नोव्हेंबरपर्यंत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला कळवायचे आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -