घरमुंबईवृद्धा महिलांना लक्ष करणारा सोनसाखळी चोर अटकेत!

वृद्धा महिलांना लक्ष करणारा सोनसाखळी चोर अटकेत!

Subscribe

अटक करण्यात आलेल्या या सोनसाखळी चोराने गेल्या आठवड्यात सायन येथे एका जैन सोसायटीत एका वृद्धेची सोनसाखळी खेचून पळ काढला होता. या चोरावर सायन, माटुंगा, अँटॉप हिल आदी परिसरात ५० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे आहेत.

सायन माटुंगा परिसरातील जैन सोसायटी मधील वृद्धांना लक्ष करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणाऱ्या एका सराईत सोनसाखळी चोराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या सोनसाखळी चोराने गेल्या आठवड्यात सायन येथे एका जैन सोसायटीत एका वृद्धेची सोनसाखळी खेचून पळ काढला होता, त्यात वृद्ध महिला जखमी झाली होती. भरत नवलचंद कुरमी (४०) असे अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोराचे नाव आहे.

हेही वाचा – उत्तर वसईत सोनसाखळी चोरांची दहशत

- Advertisement -

सीसीटीव्हीत कैद झाला होता प्रकार

सायन येथील जैन सोसायटी या ठिकाणी राहणाऱ्या इच्छाबेन व्होरा (८५) या ९ नोव्हेंबर रोजी दुपारी जैन मंदिरातून घरी येत असताना त्याचा मागावर असलेल्या एका चोरट्याने इच्छाबेन या वृद्धा इमारतीच्या पायऱ्या चढून जात असताना पाठीमागून त्यांना धक्का देऊन खाली पाडले, त्या नंतर इच्छाबेन यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला होता. या घटनेत इच्छाबेन या वृद्धाच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वृद्धाला लुटताना या चोरट्याचे सर्व कृत्य सोसायटीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते, आणि हा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सोनसाखळी चोरला अटक करण्यासाठी सायन पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथक त्याच्या मागावर होते.

हेही वाचा – कुख्यात साखळीचोराची फिल्मीस्टाईल अटक

- Advertisement -

पोलिसांनी अशी केली कारवाई

हा सोनसाखळी चोर दररोज दिवा रेल्वे स्थानकातून सीएसटी कडे येणारी पहिली ट्रेन पकडून मुंबई येत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे रेवळे यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून त्याकामी लावले. गुरुवारी पहाटे गुन्हे शाखेचे पथक दिवा रेल्वे स्थानकात दबा धरून बसले होते. भरत नवलचंद कुरमी हा सोनसाखळी चोर दिवा स्थानकात आला असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. भरत याच्यावर सायन, माटुंगा, अँटॉप हिल आदी परिसरात ५० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे आहेत. भरत हा पूर्वी सायन परिसरात वास्तव्यास होता. सध्या तो कळवा येथे राहायला आला आहे. पहाटेच्या सुमारास सायन,माटुंगा आदी परिसरातील जैन सोसायटीमधील वृद्धांना आपले लक्ष बनवून त्यांना तो लुटत होता. त्याच्या या प्रकारच्या गुन्हयाच्या पद्धतीमुळे अनेक वृद्ध महिला जखमी झालेल्या आहेत.


हेही वाचा – ५० पेक्षा जास्त गुन्हयांची नोंद, सोनसाखळी चोर अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -