घरक्रीडाTokyo Olympics : बॅडमिंटन महिला दुहेरीतील चीनच्या वर्चस्वाला शह; इंडोनेशियन जोडीला सुवर्ण

Tokyo Olympics : बॅडमिंटन महिला दुहेरीतील चीनच्या वर्चस्वाला शह; इंडोनेशियन जोडीला सुवर्ण

Subscribe

१९९२ सालापासून चीनने केवळ दोन ऑलिम्पिकचा अपवाद वगळता सर्वच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटन महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे.

इंडोनेशियाच्या ग्रेसिया पॉली आणि अप्रियानी राहायु या जोडीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारी ऐतिहासिक कामगिरी केली. या जोडीने बॅडमिंटन महिला दुहेरीत चीनच्या वर्चस्वाला शह दिला. पॉली आणि राहायुने अंतिम सामन्यात चीनच्या चेन क्विंगचेन आणि जिया यिफान या जोडीवर २१-१९, २१-१५ अशी सरळ गेममध्ये मात केली. बॅडमिंटन महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकण्याची ही इंडोनेशियन जोडीची पहिलीच वेळ ठरली. १९९२ सालापासून ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचा महिला दुहेरी हा प्रकार खेळला जात आहे. चीनने या प्रकारात केवळ दोन ऑलिम्पिकचा अपवाद वगळता सर्वच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यंदा मात्र इंडोनेशियन जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली.

किम सो-येओन्ग व काँग ही-याँगला कांस्य

पॉली आणि राहायुने महिला दुहेरीचा अंतिम सामना सलग दोन गेममध्ये जिंकला. २०१६ रिओ ऑलिम्पिकनंतर पॉली निवृत्तीचा विचार करत होती. मात्र, तिने बराच विचार केल्यानंतर तिच्यापेक्षा १० वर्षाने लहान असणाऱ्या राहायुसोबत खेळत राहण्याचा निर्णय घेतला. महिला दुहेरीत कांस्यपदकासाठीचा सामना किम सो-येओन्ग व काँग ही-याँग आणि ली सो-ही व शिन सेउन्ग-चॅन या दक्षिण कोरियाच्या जोड्यांमध्ये झाला. या सामन्यात किम सो-येओन्ग व काँग ही-याँग या जोडीने २१-१०, २१-१७ अशी बाजी मारत कांस्यपदक जिंकले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -