घरक्रीडाNZ vs NED, 2nd ODI : टॉम लाथमने आपल्या वाढदिवसाला झळकावलं सहावं...

NZ vs NED, 2nd ODI : टॉम लाथमने आपल्या वाढदिवसाला झळकावलं सहावं वनडे शतक, मास्टर ब्लास्टरच्या क्लबमध्ये नावाची नोंद

Subscribe

न्यूझीलंड आणि नेदरलँड्स यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हेमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने ९ विकेट गमावत २६४ धावा केल्या. किवी संघाने ३२ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर कर्णधार टॉम लाथमने सावध खेळी करत कारकिर्दीतील सहावे वनडे शतक झळकावले. आज लाथमचा वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवसानिमित्त त्याने सहावं वनडे शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या यांच्या यादीत त्याच्या नावाची नोंद म्हणजेच समावेश करण्यात आला आहे.

लाथमने १२३ बॉलमध्ये १० चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १४० धावांची नाबाद खेळी केली. हे त्याचे वनडेतील सहावे आणि कर्णधार म्हणून तिसरे शतक आहे. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे न्यूझीलंडला २५० च्या पुढे मजल मारता आली. वनडे क्रिकेटच्या इतिहासात टॉम लाथम हा पाचवा फलंदाज ठरला आहे.

- Advertisement -

लाथमने आपल्या ३०व्या वाढदिवशी उत्तम कामगिरी केली आहे. भारताचा क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील त्याच्या २५ व्या वाढदिवसाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३४ धावांचे शतक झळकावले होते. लाथमचा देशबांधव रॉस टेलरनेही हा पराक्रम केला होता. त्याने २७ व्या वाढदिवसाला पाकिस्तानविरुद्ध १३१ धावांची नाबाद खेळी केली होती. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यानेही त्याच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त बांगलादेशविरुद्ध १३० धावा ठोकल्या होत्या. त्याचबरोबर भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीने देखील त्याच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त इंग्लंडविरुद्ध  १०० धावांची नाबाद खेळी केली होती.

- Advertisement -

दरम्यान, लाथमने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. एक कर्णधार म्हणून त्याने १५ सामन्यात ७०० हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या धावांची सरासरी पाहिली असता ७२.५ टक्के इतकी आहे. लाथमने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात एक शतक देखील झळकावलं आहे.


हेही वाचा :दर ३ वर्षांनी घटस्फोट घेतल्यानंतर हे जोडपं एकमेकांशी पुन्हा करतात लग्न, कारण ऐकून बसेल धक्का


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -