घरक्रीडाNZ vs BANG : कर्णधार लेथमचे झंझावाती शतक; न्यूझीलंडला विजयी आघाडी

NZ vs BANG : कर्णधार लेथमचे झंझावाती शतक; न्यूझीलंडला विजयी आघाडी

Subscribe

न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

कर्णधार टॉम लेथमने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशला ५ विकेट राखून पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २७१ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार लेथमने १०८ चेंडूत नाबाद ११० धावांची खेळी केल्याने न्यूझीलंडने २७२ धावांचे लक्ष्य १० चेंडू राखून गाठले. लेथमचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले.

मोहम्मद मिथुनची फटकेबाजी

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बांगलादेशच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर लिटन दास खातेही न उघडता बाद झाला. मात्र, कर्णधार तमिम इक्बाल (७८) आणि सौम्या सरकार (३२) यांनी ८१ धावांची भागीदारी रचत बांगलादेशला सावरले. तर अखेरच्या षटकांत मोहम्मद मिथुनने (नाबाद ७३) केलेल्या फटकेबाजीमुळे बांगलादेशने ५० षटकांत ६ बाद २७१ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

लेथम, कॉन्वेने सावरले

२७२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची ३ बाद ५३ अशी अवस्था होती. परंतु, कर्णधार लेथम आणि डेवॉन कॉन्वे यांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडचा डाव सावरला. कॉन्वे ७२ धावांवर धावचीत झाला. मात्र, लेथमने आधी जिमी निशम (३०) आणि मग डॅरेल मिचेल (नाबाद १२) यांना हाताशी घेत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -