तुमचा रक्त गट कोणताय? ‘या’ रक्तगटाच्या लोकांना Diabetes चा धोका सर्वाधिक!

एकट्या भारतात ८ कोटी मधुमेहाचे रूग्ण...

प्रातिनिधीक फोटो

धावपळीचे जीवन जगत असताना जगभरात ४३ कोटी लोकांना मधुमेह अर्थात Diabetes हा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, फक्त भारतात ८ कोटी मधुमेहाचे रूग्ण असल्याचे सांगितले जात आहे. मधुमेह हा असा आजार आहे की जो एकदा झाला की, संपूर्णपणे बरा होत नाही. यासह युरोपियन असोसिएशनच्या डायबिटोलॉजी नाव असणाऱ्या जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार असे सांगण्यात आले की, ज्या लोकांचा रक्तगट A किंवा B असणाऱ्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका सर्वाधिक असतो. तर या दोन्ही रक्तगटांच्या तुलनेत रक्तगट O असणाऱ्यांना हा धोका जरा कमी संभवतो.

या करण्यात आलेल्या अभ्यासात तब्बल ८० हजार महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. या अभ्यासादरम्यान रक्तगट A आणि B सह टाईप २ च्या लोकांमध्ये मधुमेहाचा काय संबंध असतो याची तपासणी करण्यात आली. या ८० हजार महिलांपैकी ३ हजार ५५३ महिलांना टाईप २ मधुमेह झाल्याचे आढळून आले. मात्र या महिलांचा रक्तगट O नसल्याचे सांगितले गेले.

या झालेल्या अभ्यासात अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे रक्तगट A आणि B असणाऱ्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अभ्यासात १० टक्के महिलांचा रक्तगट A होता आणि त्यांना टाईप २ प्रकारचा मधुमेह झाल्याचे आढळून आले. तर २१ टक्के महिला अशा होत्या त्यांचा रक्तगट हा B होता आणि त्यांना देखील टाईप २ प्रकारचा मधुमेह झाल्याचे दिसले.  मात्र ज्यांच्या रक्तगट O नसतो, त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं प्रथिनं असतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढते. यासह असे अनेक मॉलेक्युल्स असतात, ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. आणि ज्याचा संबंध टाईप २ मधुमेहाशी असतो.