Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : रोहित, विराटकडून 'ही' गोष्ट शिकण्याचा प्रयत्न - पुजारा  

IPL 2021 : रोहित, विराटकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा प्रयत्न – पुजारा  

यंदा खेळाडू लिलावात पुजाराला चेन्नईने ५० लाख रुपयांत खरेदी केले.

Related Story

- Advertisement -

चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ मानला जातो. त्याने कसोटी संघातून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तसेच तो त्याच्या संयमी आणि सावध फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, याच गोष्टीमुळे त्याला इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत २०१४ नंतर खेळण्याची संधी मिळालेली नाही. यंदा मात्र तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणार आहे. खेळाडू लिलावात त्याला चेन्नईने ५० लाख रुपयांत खरेदी केले. यंदा मिळालेल्या संधीचे सोने करण्यास पुजारा उत्सुक आहे. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये मोठे फटके न मारता वेगाने धावा कशाप्रकारे करता येतील हे त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला आहे.

स्ट्राईक रेट खूप महत्वाचा

मी भारतीय स्थानिक क्रिकेट आणि कौंटी क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांचे बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये धावा कशा करायच्या हे मला ठाऊक आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट खूप महत्वाचा असतो. मी मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जात नाही. मात्र, विराट आणि रोहितही मोठे फटके मारत नाहीत. असे असतानाही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांनी वेगाने धावा करण्यासाठी मार्ग शोधून काढले आहेत. त्यांच्याकडून हे शिकण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे पुजारा म्हणाला.

अधिक आक्रमकतेने खेळले पाहिजे

- Advertisement -

तसेच केन विल्यमसन आणि स्टिव्ह स्मिथ या परदेशी फलंदाजांकडूनही शिकण्याचा माझा प्रयत्न आहे. हे दोघेसुद्धा वेडेवाकडे फटके मारत नाहीत. मात्र, तरीही त्यांनी धावा करण्यासाठी वेगळे मार्ग शोधून काढले आहेत. मी अधिक आक्रमकतेने खेळले पाहिजे याबाबत दुमत नाही. परंतु, मी आता मानसिकदृष्ट्या माझ्या खेळात बदल करण्यासाठी तयार आहे, असेही पुजाराने सांगितले.

- Advertisement -