COVID-19: इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाची वाढली चिंता; दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

COVID-19: Two Indian cricketers tested positive in UK, one still in isolation but asymptomatic

इंग्लंड (England) विरोधात सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजच्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघांची (Indian Cricket Team) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील दोन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. कसोटीपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत दोन भारतीय खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. पण कोरोनाबाधित त्या भारतीय खेळाडूंची नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. जे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यापैकी एक रिकव्हर असून दुसऱ्या खेळाडूची लवकरच दुसरी चाचणी केली जाणार आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडूंना थंडी लागणे, खोकला अशी सौम्य लक्षणे दिसून आली होती. परंतु दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे. दोन्ही खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एका खेळाडूची चाचणी निगेटिव्ह आली आहे, तर दुसऱ्या खेळाडूची चाचणी १८ जुलैला होणार आहे. येत्या १८ जुलैला या खेळाडूच्या क्वारंटाईनचा १० दिवस आहे. या खेळाडूची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर लवकरच हा खेळाडू इतर संघाचा कँपमध्ये सामिल होईल.

सुत्रांनी एएनआय अशी माहिती दिली आहे की, इंग्लंडच्या टेस्ट सीरिजपूर्वी हा चिंतेचा विषय नाही आहे. कारण सर्व खेळाडू ठीक आहेत. नियमांचे पालन करत आहेत आणि सर्वांची चाचणी केली जात आहे. माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड विरोधातील सामना रंगणार आहे. त्यापूर्वी २० जुलैला भारतीय संघ एक काउंटी मॅच खेळणार आहे, जी तीन दिवसीय प्रॅक्टिस मॅच असणार आहे.

सर्व भारतीय खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर ब्रेकवर होते. सर्व खेळाडू यादरम्यान ब्रिटनमध्ये होते आणि आपल्या कुटुंबियांसोबत टाईम्स स्पेंड करत होते. पण इंग्लंड विरोधात होणाऱ्या पाच मॅच सीरीजपूर्वी सर्व खेळाडूंना कँपमध्ये एकत्र व्हायचे होते.