घरक्रीडाIND vs NZ 2nd Test : दुसऱ्या सामन्यात कोहली स्वस्तात परतला; कित्येक...

IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या सामन्यात कोहली स्वस्तात परतला; कित्येक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी हुकली

Subscribe

सध्या भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होत आहे

सध्या भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे टी-२० विश्वचषकातील अपयशाला विसरून कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केले. कोहलीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात कित्येक मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी होती. बायो-बबलमधील थकव्यानंतर कोहलीने न्यूझीलंडविरूध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन केले. वानखेडे स्टेडियमवर कोहलीला जगभरातील कित्येक दिग्गजांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती. मात्र दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार कोहली त्याचे खातेही न उघडता स्वस्तात परतला. विराटला न्यूझीलंडच्या अजाज पटेलने ३० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद केले.

रिकी पाँटिंगची बरोबरी साधण्याची होती संधी

विराट कोहलीने जर न्यूझीलंडविरूध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले असते तर तो रिकी पाँटिंग सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर नंतर सर्वात जास्त शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला असता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर ७० शतकांची नोंद आहे. यामध्ये २७ केवळ कसोटी सामन्यांतील आहे. तर रिकी पाँटिंगच्या नावावर ५६० सामन्यांत ७१ शतकांची नोंद आहे.

- Advertisement -

कर्णधार म्हणून सर्वात जास्त शतक झळकावणारे खेळाडू

विराट कोहली आणि रिकी पाँटिंग यांच्यामध्ये कर्णधार म्हणून शतकांची समान नोंद आहे. कोहलीला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगच्या पुढे जाण्यासाठी फक्त एका शतकाची गरज आहे. जर विराट कोहलीने आणखी एक शतक केले तर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज बनू शकतो. विराट कोहली आणि रिकी पाँटिंग दोघांनी सध्या कर्णधार असताना ४१-४१ शतके झळकावली आहेत सोबतच दोघेही अव्वल स्थानावर आहेत.


हे ही वाचा:http://IPl Retention : मुंबईने रिटेन न केल्याने भावुक हार्दिक पांड्या; शेयर केला भावनिक व्हिडिओ

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -