घरक्रीडासचिनचा १०० शतकांचा विक्रम कोहली मोडू शकेल -ब्रेट ली

सचिनचा १०० शतकांचा विक्रम कोहली मोडू शकेल -ब्रेट ली

Subscribe

कोहलीने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली, तर पुढील ७-८ वर्षांत तो सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला वाटते.  

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत कसोटीत २७ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ अशी एकूण ७० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (१००) नावे आहे. मात्र, ३१ वर्षीय कोहलीने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली, तर पुढील ७-८ वर्षांत तो सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला वाटते.

कोहली सध्या ज्या पद्धतीने खेळत आहे ते लक्षात घेता, पुढील ७-८ वर्षांत तो नक्कीच सचिनचा विक्रम मोडू शकेल. मात्र, यासाठी प्रतिभा, फिटनेस आणि मानसिक दृढता या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट आपण बाजूला ठेवू, ती म्हणजे फलंदाज म्हणून कोहलीतील प्रतिभा. तो किती प्रतिभावान फलंदाज आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. फिटनेसबाबत बोलायचे तर बहुदा कोहलीइतका फिट दुसरा फलंदाज नाही. वयाच्या ३० व्या वर्षी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक दृढता आणि खासकरुन परदेशात खेळताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता. माझ्या मते सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आवश्यक असलेल्या या तिन्ही गोष्टी कोहलीमध्ये आहेत, असे ली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -