घरक्रीडाऑस्ट्रेलियात पाच कसोटी खेळण्याबाबत निर्णय नाही!

ऑस्ट्रेलियात पाच कसोटी खेळण्याबाबत निर्णय नाही!

Subscribe

क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका चारऐवजी पाच सामन्यांची व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. बीसीसीआयने मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असले तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया ऑक्टोबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषकच नाही, तर घरच्या मैदानावर वर्षाअखेरीस होणारी भारताविरुद्धची द्विपक्षीय मालिका खेळण्यासही उत्सुक आहे. इतकेच नाही, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका चारऐवजी पाच सामन्यांची व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. बीसीसीआयने मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.

योग्य वेळ आल्यावरच निर्णय

योग्य वेळ आल्यावरच निर्णय घेतला जाईल आणि सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही योजना आखणे घाईचे ठरेल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला वाटते. आम्ही ऑस्ट्रेलियात पाच सामने खेळण्यास उत्सुक आहोत का, हे आताच बोलता येणार नाही. सध्याची परिस्थिती आपल्याला खूप गोष्टी शिकवत आहे आणि आपण एका वेळी केवळ एक चेंडू खेळण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.सध्याची परिस्थिती लक्षात घेता, ज्या गोष्टीला अजून सात-आठ महिने आहेत, त्याबाबत आताच काही बोलणे योग्य नाही. ऑक्टोबरमध्ये कशी परिस्थिती असेल कोणास ठाऊक? प्रवासावरील निर्बंधांत काही बदल होतील का हे आपण आताच सांगू शकत नाही, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला

भारतीय संघासाठी नियमांत बदल?

करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश करता येणार नाही. मात्र, भारतीय क्रिकेट संघासाठी ऑस्ट्रेलियन सरकार नियमांत थोडे बदल करु शकेल. भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारताविरुद्धची मालिका न झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकेल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आधीच आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे त्यांना मदत व्हावी यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळू शकेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -