Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा गौतम गंभीर वादावर विराट कोहलीने सोडलं मौन, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

गौतम गंभीर वादावर विराट कोहलीने सोडलं मौन, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा एकदा मैदानात भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रॉयल चॅलेंजर बेंगळुरू आणि लखनऊ जायट्स संघामध्ये झालेला सामना चांगलाच चर्चेत आला. या वादानंतर आता विराट कोहलीने मौन सोडले आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटले की, आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही.

लखनऊच्या एकना स्टेडियमवर सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ जायंट्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने संघाने निर्धारीत 20 षटकात 9 विकेट गमावून 126 धावा केल्या. कमी धावसंख्येचा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यामुळे सामना चांगला रंगात आला होता. परंतु लखनऊ संघाच्या एकामागून एक विकेट पडत गेल्यामुळे लखनऊला 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या सामन्यातील लखनऊच्या फलंदाजीवेळी 17 व्या षटकात विराट कोहली आणि लखनऊच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगमुळे नवीन उल हक याने विराटशी वाद झालण्यास सुरूवात केली. त्यामुळे अमित मिश्रा आणि पंचांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली आणि त्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर या दोन्ही संघात पार पडलेल्या 15 व्या सामन्यात लखनऊ संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता. यावेळी लखनऊ संघाचा मार्गदर्शक गंभीरने बेंगळुरूच्या खेळाडूंकडे बोट करून शांत राहण्याचा इशारा केला होता. याशिवाय मॅचविनिंग खेळी करणाऱ्या पूरनने फ्लाइंग किस केले होते आणि रवी बिश्नोईने मोठ्याने ओरडून आनंद साजरा केला होता. त्यामुळे सोमवारी झालेल्या सामन्यात प्रत्येक विकेटनंतर विराट कोहली फिल्डिंग करताना चांगलाच अग्रेसिव्ह दिसला. तो गौतम गंभीर, पूरन आणि रवी बिश्नोईच्या प्रत्येक गोष्टीला चांगलेच उत्तर देताना दिसला. मात्र या सर्व प्रकरणी आयपीएलच्या व्यवस्थापकांकडून कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहली, गौतम गंभीरवर फीसच्या १०० टक्के रकमेचा दंड आकारणार आहे, तर नवीन उल हक याला सुद्धा सामन्यातून मिळणाऱ्या रक्कमेमधून 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

- Advertisement -

वादावर विराटने सोडले मौन
गौतम गंभीर आणि नवीन उल हकसोबतच्या वादावर विराटने मौन सोडले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर रोमनचे सम्राट Marcus Aurelius यांच्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याने लिहिले की, ‘आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही.’

- Advertisment -