घरIPL 2020हॅपी बर्थ-डे किंग कोहली; क्रिकेटपटूंकडून भारतीय कर्णधाराला शुभेच्छा!

हॅपी बर्थ-डे किंग कोहली; क्रिकेटपटूंकडून भारतीय कर्णधाराला शुभेच्छा!

Subscribe

विराट कोहलीचा आज ३२ वा वाढदिवस आहे.

क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आणि सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीचा आज ३२ वा वाढदिवस आहे. कोहली सध्या युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत आहे. बंगळुरूने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला असून शुक्रवारी इलिमिनेटरच्या सामन्यात त्यांच्यासमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून कोहलीच भारताचे नेतृत्व करणार आहे.

२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कोहली मागील काही वर्षांपासून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. कर्णधारपद यशस्वीपणे सांभाळताना कोहलीने फलंदाज म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे. तसेच तो सध्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या, तर एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. या दमदार कामगिरीच्या जोरावर कोहलीने स्वतःचे अनेक चाहते निर्माण केले आहेत, ज्यात आजी-माजी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. त्यांनी कोहलीला वाढदिवशी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -