घरक्रीडाViral Video : राष्ट्रगीता दरम्यानच्या कृत्याने विराट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय...

Viral Video : राष्ट्रगीता दरम्यानच्या कृत्याने विराट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय आहे प्रकरण ?

Subscribe

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल (रविवार) तिसऱ्या वनडे मालिकेचा शेवटचा सामना खेळण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिका ३-० ने जिंकली आहे. परंतु कसोटी मालिकेचं कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या अडचणीत पु्न्हा एकदा वाढ झाली आहे. राष्ट्रगीत सुरू असताना त्याने केलेल्या कृत्यामुळे तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तसेच त्याने जे कृत्य केलंय. ते दृश्य ब्रॉडाकास्टच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. मात्र, दुसरीकडे या कृत्यामुळे विराट कोहलीवर नेटकऱ्यांनी आणि क्रिकेट प्रेमींनी निशाणा साधला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

टीम इंडियाचा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. यावेळी सर्व खेळाडू स्तब्धपणे सावधान उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. मात्र, विराट कोहली राष्ट्रगीत सुरू असताना तोंडामध्ये च्युईंगम चघळताना दिसला. त्यानंतर त्याने स्तब्ध असलेले हात देखील हलवले, याच कारणामुळे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या एका चुकीमुळे चाहते आणि नेटकरी नाराज झाले आहेत. विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच अनेक क्रिकेट प्रेमींनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे.

- Advertisement -

विराटने केला राष्ट्रगीताचा अवमान

दक्षिण आफ्रिकाविरूद्ध काल (रविवार) झालेल्या शेवटच्या सामन्यात विराटच्या कृत्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयकडे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विराटने राष्ट्रगीताचा अवमान केल्यामुळे नेटकऱ्यांकडून टीकेची झड उठत आहे. याआधीही २०१७ साली श्रीलंकेचा संघ भारतीय दौऱ्यावर असताना तो च्युईंगगम खाताना दिसला होता.

- Advertisement -

दरम्यान, टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा वनडे सामना रोमांचक ठरला. दक्षिण आफ्रिकेनं पु्न्हा एकदा टीम इंडियाला पराभूत केलं आणि हाताशी आलेला सामना टीम इंडियाने ३-० ने गमावला आहे.


हेही वाचा : Live Update: राज्यभरातील तापमानात मोठी घट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -