घरक्रीडाधोनीबाबत आमचं ठरलंय

धोनीबाबत आमचं ठरलंय

Subscribe

बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे मोठे भाष्य

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या भविष्याबद्दल आपले मत स्पष्ट केले आहे. धोनीच्या भविष्याविषयी निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे. पुढील काही महिन्यांत सर्व काही स्पष्ट होईल,असे गांगुलीने म्हटले आहे. सर्वच गोष्टी सर्व गोष्टी सार्वजनिकरित्या सांगता येत नाहीत.गोष्टी स्पष्ट आहेत. परंतु, सार्वजनिक व्यासपीठावर काही गोष्टी सांगितल्या जाऊ शकत नाही. धोनीबद्दल संपूर्ण स्पष्टता आहे आणि वेळ येईल तेव्हा तुम्हालाही सर्व काही कळेल,” असे धोनीच्या भविष्याबद्दल बोलताना सौरव गांगुली म्हणाला.

तसेच “बीसीसीआय , धोनी आणि निवडकर्ता यांच्यात पारदर्शकता आहे. जेव्हा अशा चॅम्पियन खेळाडूंबद्दल बोलता तेव्हा काही गोष्टी बंद दाराच्या आत ठेवाव्या लागतात. एमएस धोनी हा भारताचा उत्तम खेळाडू आहे. सर्व गोष्टी पारदर्शक आहेत आणि सर्व कोठे उभे आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे,” असेही गांगुली पुढे म्हणाला.याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही काही दिवसापूर्वी म्हटले होते की, आयपीएल 2020 नंतर धोनीच्या भविष्याविषयीची स्पष्टता कळेल.

- Advertisement -

धोनी भारताकडून शेवटचा 2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतलेली आहे.आयसीसी विश्वचषक 2019 नंतर धोनीच्या निवृत्तीबाबत बरीच चर्चा झाली आहे. परंतु, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -