Eco friendly bappa Competition
घर क्रीडा काय आहे IPL चा बायो-बबल? जाणून घ्या

काय आहे IPL चा बायो-बबल? जाणून घ्या

Subscribe

बहुप्रतिक्षित आयपीएल २०२० १९ सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सुरु होणार आहे. कोरोनामुळे यावर्षी आयपीएल यूएईमध्ये होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ या सर्वांसाठी खास बायो-बबल वातावरण तयार करण्यात आलं आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या दरम्यान झालेल्या मालिकेत तुम्ही इको बबल किंवा बायो बबल हे नाव बर्‍याचदा ऐकलं असेल. आता आयपीएलमध्येही त्याचा सतत उल्लेख केला जात आहे. पण हे बायो-बबल आहे तरी काय? हे कसं काम करतं? हे कोरोनापासून प्रत्येकाचं संरक्षण कसं करू शकतं? शेवटी कोणालाही या बबलच्या बाहेर जाण्याची परवानगी का नाही आणि जर एखाद्या खेळाडूने बायो-बबल मोडला तर काय होईल? जाणून घेऊया…

काय आहे बायो बबल?

बायो बबल असं वातावरण आहे, जिथे बाहेर फिरणारे, राहणाऱ्यांचा बायो बबल वातावरणात राहणाऱ्यांसोबत संपर्क येत नाही. बायो-बबलमध्ये राहणारे बाहेरील जगाशी संपर्क करु शकत नाही. इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्ये सहभागी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचारी, सामनाधिकारी, हॉटेल कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाते आणि त्यानंतर सर्वांना बायो बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाते. प्रवेश केल्यानंतर तसंच कोरोना चाचणी करणारे डॉक्टर्सना देखील बाहेर जाण्याची परवानगी नाही आहे.

बायो बबल कसा बनवला आहे?

- Advertisement -

२० ऑगस्टनंतरच सर्व संघ दुबईमध्ये आले. आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचार्‍यांची दुबईला जाण्यापूर्वी दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. . दुबईमध्ये नियमांनुसार प्रत्येकाला सात दिवस क्वारंटाइन करण्यात आलं. या कालावधीत, प्रत्येकाची तीन वेळा निगेटिव्ह चाचणी आल्यानंतरच बायो बबलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर फक्त मैदान आणि हॉटेलमध्येच राहण्याची परवानगी आहे. केवळ बबलच्या आत असलेलेच त्यांना भेटू शकतात. स्पर्धेदरम्यान चाहत्यांना, मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. संघातील सदस्यांसाठी आणि सामना प्रसारित करणार्‍या उर्वरित कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र बबल तयार करण्यात आला आहे. स्पर्धा संपेपर्यंत बबलमधील सर्व लोकांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही.

बायो-बबल तोडल्यास काय होणार?

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानुसार (बीसीसीआय) बायो बबल तोडला तर आयपीएलची आचारसंहिता भंग केल्याबद्दल दोषी मानला जाईल आणि त्याअंतर्गत शिक्षा दिली जाईल. जर एखादा खेळाडू बायो-बबलमधून बाहेर पडला तर काही सामने बंदी घातली जाऊ शकते. जर खेळाडूने बायो बबलचा नियम मोडला तर खेळाडूचं कंत्राट रद्द केलं जाणार, असा इशारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या खेळाडूंना दिला आहे.

 

- Advertisment -