घरक्रीडाWomen’s World Boxing Championships : सोनिया चहल अंतिम फेरीत ; सिमरनजीत पराभूत 

Women’s World Boxing Championships : सोनिया चहल अंतिम फेरीत ; सिमरनजीत पराभूत 

Subscribe

भारताची २१ वर्षीय बॉक्सर सोनिया चहलने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सोनिया चहलने ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाच्या जो सॉन व्हा हिला ५-० अशी धूळ चारली. या सामन्यात सुरुवातीपासून सोनियाने आक्रमक खेळ केला. त्याच्या आक्रमणाचे सॉन व्हा कडे उत्तर नव्हते. त्यामुळे तिने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. सॉन व्हा हिने जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे २०१६ मध्ये बॉक्सिंग करायला सुरुवात केलेल्या सोनिया समोर तिचे पारडे जड मानले जात होते. पण सोनियाने अप्रतिम खेळ करत हा सामना जिंकला.

या कामगिरीचा आनंद 

या विजयानंतर सोनिया म्हणाली, “मी अंतिम फेरीत पोहोचले आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. इतक्या लहान वयात इतकी चांगली कामगिरी केल्याचा मला आनंद आहे. माझ्या घरच्या लोकांसमोर ही कामगिरी केल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. अंतिम फेरीतही मी जिंकण्याचा प्रयत्न करिन.”

सिमरनजीत पराभूत 

सिमरनजीत कौरला पराभवाला सामोरे जावे लागले. तिचा ६४ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या डॅन डॉ हिने ४-१ असा पराभव केला. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -