घरदेश-विदेशदिल्लीत स्पा सेंटर आणि मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय?

दिल्लीत स्पा सेंटर आणि मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय?

Subscribe

दिल्लीतील स्पा सेंटर आणि मसाज पार्लरमध्ये अनधिकृतपणे वेश्याव्यवयास सुरु असल्याच्या बऱ्याच तक्रारी महिला आयोगकडे आल्या आहेत. त्यामुळे महिला आयोगाकडून नोटीस बजावली गेली आहे.

दिल्लीत स्पा सेंटर आणि मसाज पार्लरमध्ये वेश्यावसाय सुरु असल्याच्या संशयावरुन महिला आयोगाने शहरातील स्पा सेंटर आणि मसाज पार्लरची माहिती मागितली आहे. यासाठी महिला आयोगाने दिल्ली पोलीस, लेबर डिपार्टमेंट आणि नगर अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. दिल्लीतील स्पा सेंटर आणि मसाज पार्लरमध्ये अनधिकृतपणे वेश्याव्यवयास सुरु असल्याच्या बऱ्याच तक्रारी महिला आयोगकडे आल्या आहेत. त्यामुळे महिला आयोगाकडून माहिती मागवली जात आहे.

हेही वाचा – महानगरचा दणका; हनुमान गल्लीतील वेश्याव्यवसाय बंद!

- Advertisement -

याअगोदर पोलिसांनी केली होती कारवाई

काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी स्पा सेंटर आणि मसाज पार्लरमध्ये धाड टाकली होती. पोलिसांनी या सेंटर विरोधात कारवाई केली होती. त्यामुळे ज्या ज्या सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांची माहिती महिला आयोगाने केली आहे. याबाबत महिला आयोगाच्या स्वाती मालीवाल म्हणाल्ंया की, वेश्याव्यवसायांचे हे रॅकेट मर्यादित असे नाही. संपूर्ण शहरातील स्पा सेंटर आणि मसाज पार्लच्या महिलांना या व्यवसायात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे दिल्ली महिला आयोग स्रव मसाज आणि स्पा सेंटरची माहिती मिळवत आहे. त्याचबरोबर काम नियमांप्रमाणे सुरु असल्याची खातरजमा करत आहे, असेही मालीवाल यांनी सांगितले. महिला आयोगाला ही माहिती २८ नोव्हेंबरपर्यंत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी बळजबरी करणारी महिला अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -