घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉयची दुसऱ्या फेरीत धडक

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉयची दुसऱ्या फेरीत धडक

Subscribe

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयने विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्याने न्यूझीलंडच्या अभिनव मनोटाला पराभूत करत दुसरी फेरी गाठली आहे.

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने दुसर्‍या फेरीत धडक मारली आहे. त्याने पहिल्या फेरीत न्यूझीलंडच्या अभिनव मनोटाला पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

असा झाला सामना

सामन्याच्या सुरूवातीपासूनच प्रणॉयचा सामन्यावर दबदबा दिसून येत होता. त्याने पहिला सेट २१-१२ च्या फरकाने जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. त्यानंतर त्याने दुसरा सेटही २१-१७ च्या फरकाने जिंकत सामन्यात दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवत दुसऱ्या फेरीत दिमाखदार प्रवेश मिळवला. २८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जागतिक क्रमवारीत ११ वा असणार्‍या प्रणॉयने सामन्याच्या सुरुवातीपासूनच मनोटावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे बीनसीडेड मनोटाचा आत्मविश्वास कमी झाला. याचा फायदा घेत प्रणॉयने हा सामना सहजपणे जिंकला. यानंतरचा प्रणोयचा दुसऱ्या फेरीतील सामना ब्राझीलच्या योगोर कोएल्हो याच्याविरूद्ध रंगणार आहे.

- Advertisement -

भारतासाठी दुहेरी सामन्यांत पहिला दिवस संयुक्त निकालांचा

याउलट दुहेरी सामन्यांत भारतासाठी स्पर्धेचा पहिला दिवस संयुक्त निकालांचा राहिला. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी यांनी बल्गेरियन जोडी डॅनियल निकोलोव्ह आणि इवान रुसेवेचा २१-१३, २१-१८ च्या फराकाने पराभव केला. मात्र, महिला दुहेरीत भारतीय जोडी प्राजक्ता सावंत आणि संयोगिता घोरपडे यांनी निराशा केली. त्यांना पहिल्या फेरीत तुर्कीच्या बेंगीसु इर्सेटीन आणि नॅझलिकॅन इंसी या जोडीने २२-२०, २१-१४ असे पराभूत केले.

आतापर्यंत भारताचे सर्वच सामने अतिशय चुरशीचे झाले असून या पुढच्या सामन्यात भारतीय खेळाडू काय कामगिरी करणार याकडे भारतीय फॅन्सचे लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -