Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Sania Mirza: टेनिसपटू सानिया मिर्झाचा कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यात पराभव

Sania Mirza: टेनिसपटू सानिया मिर्झाचा कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यात पराभव

Subscribe

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा मंगळवारी झालेल्या डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. विशेष म्हणजे हा सामना सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीतील अखेर सामना होता.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा मंगळवारी झालेल्या डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. विशेष म्हणजे हा सामना सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीतील अखेर सामना होता. या सामन्यात आपली सहकारी अमेरिकेची मॅडिसन कीजच्यासोबतीने सरळ सेटमध्ये पराभूत होताच सानियाच्या शानदार कारकिर्दीचा अंत झाला. या सामन्यातील पराभवानंतर सानिया भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (wta dubai 2023 sania mirza ends career with first round defeat in dubai)

सानिया मिर्झा तिच्या कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात तिची अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजसोबत मैदानात उतरली. त्यांच्यासमोर रुसची सर्वात यशस्वी जोडी र्नोकिया कुडेरमेटोवा- ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांचे आव्हान होते. या स्पर्धेत सानिया मिर्झाला पहिल्याच फेरीत ४-६, ०-६ ने पराभव स्वीकारावा लागला.

- Advertisement -

या सामन्यानंतर सानिया मिर्झा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “मी कधीच पराभवाच्या भीतीने टेनिस कोर्टावर उतरले नाही. फार-फार तर काय होईल तर, माझा पराभवच. हार-जीत ही सुरूच असते. पुन्हा पुढच्या आठवड्यात नव्या स्पर्धेसाठी चांगल्या तयारीनिशी सज्ज व्हायचे. क्रीडाक्षेत्रातील कोणत्याही अव्वल खेळाडूला पराभवाची भीती नसते. नेमके 2008च्या ऑलिम्पिकदरम्यान माझे मनगट दुखावले होते. तो काळ अतिशय नैराश्याचा होता. ही दुखापत मानसिकतेवर घाव घालणारी होती. चार ऑलिम्पिकमध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व केले, हे मोठेच यश आहे. कारकिर्दीतील एखादा प्रसंग बदलण्याची संधी मिळाली, तर 2016 च्या ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाची लढत किंवा त्याआधीच्या लढती मला बदलायला आवडतील”, असे सानिया मिर्झा म्हणाली.

दरम्यान, सानिया मिर्झाने नुकतीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिप तिच्या कारकिर्दीतील शेवटची असेल, असेही तिने त्यावेळी स्पष्ट केले होते.

- Advertisement -

सानिया मिर्झाने २००९ मध्ये तिच्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. ती ऑस्ट्रेलियन ओपन २००९ स्पर्धेत महेश भूपतीसह मिश्र दुहेरीची चॅम्पियन बनली. सानियाने २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती. अशाप्रकारे सानियाने आपल्या कारकिर्दीत एकूण ६ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.


हेही वाचा – आयपीएलचे 15वे पर्व सुरू होण्यापूर्वीच चेन्नईच्या संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

- Advertisment -