घरक्रीडाYuvraj Singh Comeback : युवराज सिंह कमिंग बॅक, शेअर केला स्पेशल व्हिडिओ

Yuvraj Singh Comeback : युवराज सिंह कमिंग बॅक, शेअर केला स्पेशल व्हिडिओ

Subscribe

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वीच युवराज सिंहने मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला होता. युवराज सिंह याने जून २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती.२००७ मधील टी-२० आणि २०११ च्या वन-डे विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजने बाजी मारली होती.मात्र आता पुन्हा एकदा युवराज  क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.यासाठी युवराज सिंहने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हातात बॅट धरलेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

- Advertisement -

 

अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने इन्स्टाग्राम पोस्ट करत आपल्या परतीची घोषणा केली होती त्यानंतर आता “ती वेळ आली आहे,तुम्ही तयार आहात का? तुमच्याकडे हे सर्व पाहण्याची क्षमता आहे का?तुम्हा सर्वांसाठी एक मोठे सरप्राईज घेऊन येत आहे.”असे कॅप्शन लिहित युवराजने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बॉल, बॅटसोबत दिसत आहे. युवराजच्या कारकिर्दीशी संबंधित मोठमोठ्या आठवणी एकत्र दाखवल्या आहेत, युवराज सिंहने ६ षटकार मारले तेव्हाची रवी शास्त्रीची कॉमेंट्रीही या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते आहे.

- Advertisement -

एमएस धोनी आणि युवराजच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी  आणि फलंदाज युवराज सिंह भरपूर दिवसानंतर ऐकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. हे दोन्ही क्रिकेटर्स मोठे स्टार्स आहेत. दोघांची गाठभेट ही जाहीरातीची शूट करताना झाली. दोन्ही लेजन्डस एक दुसऱ्यासोबत भरपूर खूश आहेत. टीम इंडियाच्या माजी क्रिकेटर्सच्या दरम्यान भरपूर दिवसानंतर दोघांच्या गाठभेट झाली. युवराज सिंह आयपीएल खेळत नाही आणि मैदानाता त्यांची भेट माहीसोबत होत नाही. एमएस धोनी आणि युवराज सिंह यांचे दुनियाभरात भरपूर चाहते आहेत. युवीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये वर्ल्ड कपचे जुने पार्टनरसोबत दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


हे ही वाचा – vijay hazare trophy : ऑलराउंर पांड्याला आणखी एक झटका; दुखापतीच्या कारणास्तव विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून माघार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -